शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेद विद्यार्थ्यांना अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रियेच्या परवानगीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:45 IST

नागपूर : केंद्रीय भारतीय वैद्यक परिषदेने (सीसीआयएम) मूत्ररोग, पोट आणि आतड्यांच्या, दंतरोग, नेत्ररोगासह ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदातील ‘शल्यतंत्र’ आणि ...

नागपूर : केंद्रीय भारतीय वैद्यक परिषदेने (सीसीआयएम) मूत्ररोग, पोट आणि आतड्यांच्या, दंतरोग, नेत्ररोगासह ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदातील ‘शल्यतंत्र’ आणि ‘शालाक्यतंत्र’ पदव्युत्तरांना स्वतंत्रपणे करण्याची परवानगी दिली आहे. या विरोधात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) नेतृत्वात ‘ज्युनिअर डॉक्टर नेटवर्क’ने दोन दिवसांपासून आंदोलन हाती घेतले. यात मेडिकलचे २५०वर विद्यार्थी, इन्टर्न, निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत.

‘सीसीआयएम’च्या अधिसूचनेविरुद्ध ‘आयएमए’ने ८ डिसेंबर रोजी नागपुरात चौकाचौकात शांततामय निदर्शने केली. तर ११ डिसेंबर रोजी एकदिवसीय संपही केला. ही ‘मिश्रपॅथी’ किती धोकादायक ठरू शकते याबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेतली. तर, आयुर्वेद, नॅचरोपॅथी डॉक्टरांची नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) संपाच्या दिवशी नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. आयुर्वेद विद्यार्थ्यांना अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रियांना परवानगी देण्याच्या या विषयामुळे दोन ‘पॅथी’ समोरासमोर आल्या आहेत. हे प्रकरण शांत होत असताना १ फेब्रुवारीपासून ‘आयएमए’च्या ‘ज्युनिअर डॉक्टर नेटवर्क’ने संयोजक डॉ. संजय बसल यांच्या पुढाकारात ‘रिले उपोषण’ सुरू करण्यात आले. ‘आयएमए’च्या परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात मेडिकलचे २५०वर विद्यार्थी व डॉक्टर सहभागी झाले आहेत. मंगळवारी त्यांनी जोरदार निदर्शने करीत आयुर्वेद विद्यार्थ्यांना अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रिया परवानगीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. या आंदोलनात डॉ. बन्सल यांच्यासह डॉ. रोहित केंडे, डॉ. सौरभ मेश्राम, डॉ. श्रीनाथ फुले, डॉ. आदित्या गोयल, डॉ. पंकज पटले, डॉ. हरीश पावडे आदींचा प्रामुख्याने सहभाग होता.