शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

नागपुरात पावसाने गाठली सरासरी; धरण अजूनही कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:42 IST

१४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस पडला आहे. परंतु अजूनही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची झळ बसत आहे.

ठळक मुद्देशहरात टंचाईची झळ : तोतलाडोहचा उपयुक्त पाणीसाठा अजूनही शून्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात जून आणि जुलै या दोन्ही महिन्यात पावसाने मारलेल्या दडीमुळे जिल्ह्यात यावर्षी भीषण टंचाईचा सामना करावा लागेल, अशी भीती होती. परंतु जुलैच्या शेवटी ऑगस्ट महिन्यात पावसाने ही भीती दूर केली. १४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस पडला आहे. परंतु अजूनही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची झळ बसत आहे. 

नागपूर शहराला कदाचित पहिल्यांदाच पावसाळ्यातही टंचाईचा सामना करावा लागतो आहे. शहरामध्ये एक दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की, शहराला पाणीपुरवठा करणाºया प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. एका दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. मात्र कुणीही या गंभीर प्रश्नावर ओरडत नाही, ही शोकांतिका आहे. जिल्ह्यात १४ आॅगस्टपर्यंत पडणारा सरासरी पाऊस ६४३.९२ मि.मी. आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६६२.९१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरी, शहराला पाणी पुरवठा करणारे तोतलाडोह, कामठी खैरी या प्रकल्पात अनुक्रमे २.३२ आणि २७.९० टक्के पाणी साठ्याची नोंद झाली आहे. त्यामुळे तोतलाडोहचा उपयुक्त पाणीसाठा अजूनही शून्य असून, कामठी खैरीचा ३५.४८ दलघमी आहे. गेल्यावर्षी याच काळात तोतलाडोह मध्ये २१०.७५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता.महापालिका आणि राज्यकर्त्यांमुळे फटकाशहराच्या पाणी टंचाईला महापालिकेबरोबरच राज्यकर्ते जबाबदार आहे. मध्य प्रदेश सरकार हक्काचे पाणी अडविण्यासाठी चौराई धरण बांधत होते. हे सर्वांना माहीत होते. १९ मार्च १९९७ ला एक करार झाला होता. त्यात महापालिकेने शहराच्या पाण्यासाठी स्वतंत्र सोर्स तयार करायचा होता. तसे हमीपत्रही दिले होते. पण २२ वर्षात शहराच्या पाण्यासाठी एकही धरण बांधले नाही. विशेष म्हणजे करारानुसार पिण्याच्या पाण्यासाठी पेंचमधून फक्त १५ टक्के पाणी घ्यायचे आहे. पण महापालिकेने गेल्या वर्षी अतिरिक्त पाणी साठा वापरला. त्यामुळे ही अवस्था झाली आहे. राज्यकर्त्यांनी वेळीच लक्ष दिले असते, महापालिकेने पाण्यासाठी दुर्लक्ष केले नसते तर शहरावर पाणी टंचाई वेळ आली नसती.अ‍ॅड. आशिष जैस्वाल, नेते, शिवसेनाजिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठाप्रकल्प                   प्रकल्पाची क्षमता               टक्केवारी           उपयुक्त पाणीसाठातोतलाडोह                १०१६.८८ (दलघमी)       २.३०                      ००कामठी खैरी              १४१.७४ (दलघमी)         २७.९०                ३५.४८रामटेक                     १०३ (दलघमी)                १५.६५               १४.३६नांद                           ५३ (दलघमी)                 ७६.६१                ३१.२४वेणा                            १३५ (दलघमी)              ७६.६१               १००.४९१३ मध्यम प्रकल्प        २००.०६ (दलघमी)          ५४.४५               ९९.६४

विभागातील धरणे ३५.२० टक्के भरली 

 गेल्या काही दिवसात चांगला पाऊस झाल्याने धरणांमधील साठाही वाढू लागला आहे. विभागातील मोठी धरणे आजच्या तारखेला (१६ ऑगस्ट) ३५.२० टक्के भरली आहेत. मोठ्या धरणांपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा, गडचिरोली जिल्ह्यातील दिना आणि वर्धा जिल्ह्यातील पोथरा ही धरणे १०० टक्के भरली आहेत.  नागपूर विभागात  १८ मोठी धरणे आहेत. त्याची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही ३५५३.४९ दलघमी इतकी आहे. यात आजच्या तारखेला १२५०.७२ दलघमी (३५.२० टक्के ) इतकी भरली आहेत. तीन धरणे सोडली तर इतर धरणांमध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह २.३२ टक्के, कामठी खैरी २७.९० टक्के, रामटेक १६.१२ टक्के, लोवर नांद ६८.६८ टक्के, वडगाव ७६.६१ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ७५.८५ टक्के, सिरपूर ४८.४४, पूजारी टोला ७५.७६ टक्के, कालीसरार ४७.४६ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा-(२)  २१.३८ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २८.८५ टक्के, धाम ७३.०८, लोअर वर्धा ३६.४९ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द ४६.५७ टक्के भरले आहेत. 

 मध्यम तलावही ६२.७६ टक्के भरलीमोठ्या प्रकल्पाच्या तुलनेत विभागातील मध्यम स्वरुपातील तलाव ६२.७६ टकके भरली आहेत. विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. याची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ५३७.५८ दलघमी इतकी आहे. यामध्ये आजच्या तारखेला ३३७.४० दलघमी म्हणजेच ६२.७६ टक्के इतके पाणी साठले आहेत. 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर