आजपासून आॅटो बंद

By Admin | Updated: September 15, 2014 01:04 IST2014-09-15T01:04:02+5:302014-09-15T01:04:02+5:30

जोपर्यंत सर्व आॅटो मीटरचे कॅलिब्रेशन होत नाही तोपर्यंत आरटीओच्यावतीने आॅटोंवर होत असलेली कारवाई हुकूमशाही पद्धतीची आहे. या विरोधात १५ व १६ सप्टेंबरला आॅटो बंदचा इशारा तीन सीटर

Auto turn off today | आजपासून आॅटो बंद

आजपासून आॅटो बंद

काही संघटनांचा विरोध : बंदने चालकांचे अहित
नागपूर : जोपर्यंत सर्व आॅटो मीटरचे कॅलिब्रेशन होत नाही तोपर्यंत आरटीओच्यावतीने आॅटोंवर होत असलेली कारवाई हुकूमशाही पद्धतीची आहे. या विरोधात १५ व १६ सप्टेंबरला आॅटो बंदचा इशारा तीन सीटर आॅटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने दिला आहे, परंतु या बंदला विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनसह काही आॅटो संघटनांनी विरोध दर्शविल्याने बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
तीन सीटर आॅटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीचे महासचिव हरिश्चंद्र पवार यांनी सांगितले, आरटीओ आणि वाहतूक पोलीस विभागांना फक्त आॅटोरिक्षाच दिसून येतात. काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती करण्यात आली होती. मागील वर्षी आॅटोरिक्षांसाठी १६ वर्षांच्या मर्यादेचा निर्णय घेण्यात आला आणि आता आॅटो मीटरने चालविण्याची सक्ती केली जात आहे. दुसरीकडे अवैध वाहतूक सुरूच आहे. स्टार बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात आहे, याकडे कुणाचेच लक्ष नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी हा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु विदर्भ आॅटो रिक्षाचालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, हा बंद आॅटोरिक्षा चालकांच्या हिताचा नाही. सध्या शहरात आॅटो मीटरने चालायला लागले आहेत. याचा फायदा चालकासोबतच प्रवाशांना होत आहे. अशा वेळी बंद पाळून अवैध वाहतुकीला सहकार्य करण्यासारखेच आहे. आॅटोचालकांनी यापासून दूर रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी आॅटो युनियनचे महासचिव अल्ताफ अन्सारी यांनीही बंदला विरोध दर्शविला आहे. (प्रतिनिधी)
सुटीच्या दिवशीही कारवाईचा धडका
विना मीटर धावणाऱ्या आॅटोरिक्षांवर आरटीओ शहरचा कारवाईचा धडाका सुरूच आहे. १ सप्टेंबरपासून सुरू झालेली ही कारवाई सुटीच्या दिवशीही थांबलेली नाही. आज रविवार असतानाही १५ आॅटो जप्त करण्यात आले. आतापर्यंत ३८५ आॅटोरिक्षा जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: Auto turn off today