शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

By admin | Updated: November 22, 2014 02:40 IST

शाळा सुटल्यानंतर घरी परत जाणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला.

नरखेड : शाळा सुटल्यानंतर घरी परत जाणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. तरुणाच्या सावधगिरीमुळे हा प्रयत्न फसला. ग्रामस्थांनी आरोपीस पकडून नरखेड पोलिसांच्या हवाली केली. ही घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वंडली शिवारात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.कपिल नरसिंह (२०, रा. परसोडी-दीक्षित, ता. नरखेड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. वंडली येथील दोन अल्पवयीन विद्यार्थिनी काटोल येथे रोज ये-जा करतात. त्या दोघेही काटोल येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असून त्यापैकी एक सहावीत तर दुसरी आठवीत आहे. वंडली येथे बस जात नसल्याने या दोघींनाही कलंभा येथून वंडलीला चार कि.मी. पायी जावे लागते.शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर त्या दोघी बसने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कलंभा बसथांब्यावर उतरल्या. त्यांच्यासोबत अन्य दोन तरुणही या बसथांब्यावर उतरले. काही वेळाने आरोपी कपिल एमएच-४०/एएच-५९९८ क्रमांकाच्या मोटरसायकलने गोंडीदिग्रस येथून कलंभा बसथांब्यावर आला. येथे त्याने या विद्यार्थिनींना खंडाळ्याकडे जाणारा मार्ग विचारला. त्यावर आपण खंडाळा येथे राहात असल्याचे प्रशांत बागडे (२०) याने सांगितले. कपिलने त्याला दुचाकीवर बसविले आणि खंडाळ्याच्या दिशेने निघून गेला. प्रशांतला वंडली फाट्यावर सोडून कपिल परत कलंभा बसथांब्यावर आला. त्याने या विद्यार्थिनींना वंडली येथे सोडून देण्याची बतावणी केली. अंधार झाल्याने या दोघींनी त्याच्यावर विश्वास ठेवला. या दोघींना घेऊन तो वंडलीकडे निघाला. मात्र, वंडली फाट्यावर वंडलीकडे न वळता तो सुसाट वेगाने खंडाळ्याकडे निघाला. त्याचवेळी प्रशांत खंडाळ्याकडे पायी जात असल्याचे या दोघींना दिसला. त्यांना ‘दादा आम्हाला वाचव’ अशी मदतीची याचना करीत दुचाकीवरून उड्या मारल्या. यात दोघेही किरकोळ जखमी झाल्या. प्रशांतने लगेच मोबाईलवरून खंडाळा व सिंगारखेडा येथील त्याच्या मित्रांना माहिती देत कपिलला अडविण्याच्या सूचना केल्या. कपिलला सिंगारखेडा येथे अडवून स्थानिक तरुणांनी नरखेड पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी सिंगारखेडा येथून आरोपीला ताब्यात घेतले.माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी नरखेड पोलीस ठाण्याला भेट दिली. घटनास्थळ हे काटोल पोलीस ठाण्यांतर्गत असल्याने सदर घटनेचा तपास काटोल पोलिसांकडे देण्यात आला. ही कारवाई ठाणेदार दीपक गोतमारे, सुरेश निमखडे, श्रीनिवास वाघ, संजय शेंडे, राजेश मोरे, रविकांत डहाट, संजय इंगोले आदींनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)