शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नागपुरात पोलीस हवालदाराच्या हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:58 AM

पोलीस लाईनमध्ये दिसलेल्या अनोळखी व्यक्तींना हटकले म्हणून त्यांनी पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला चढवून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देनिर्ढावलेल्या गुंडांचा पोलीस वसाहतीत हल्ला : खळबळ, गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस लाईनमध्ये दिसलेल्या अनोळखी व्यक्तींना हटकले म्हणून त्यांनी पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला चढवून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हवालदाराचे नाव अनिल चक्रे आहे. ते पोलीस मुख्यालयात सेवारत असून, सध्या रविनगर चौकातील डॉ. पिनाक दंदे यांच्या इस्पितळात अतिदक्षता विभागात भरती आहेत. पोलीस लाईन टाकळीमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.पोलीस लाईन टाकळीमध्ये राहणारे अनिल चक्रे हे चक्रे मेजर नावाने ओळखले जातात. शुक्रवारी रात्री पोलीस कर्मचारी प्रफुल्ल धनराज राठोड आपल्या घराजवळ बसून असताना तेथे चक्रे मेजर आले. राठोड आणि चक्रे मेजर बराच वेळ गप्पा करीत बसले. त्यानंतर चक्रे मेजर तेथून निघून गेले. घराकडे जाताना चक्रे मेजर यांना दोन तरुण बसून दिसले. चक्रे मेजर यांनी त्यांना हटकले. तुम्ही कोण आहात, कशाला इकडे आले, अशी विचारणा केल्यामुळे आरोपींनी चक्रे मेजरसोबत वाद घातला. एवढेच नव्हे तर ते चक्रे मेजरच्या अंगावर धावून आले. ते पाहून चक्रे मेजर घराकडे पळाले. आरोपींनी चक्रे मेजरच्या अंगावर स्प्लेंडर मोटरसायकल नेऊन त्यांना खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. गंभीर अवस्थेतील चक्रे मेजर यांना डॉ. दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.२४ तास होऊनही आरोपींचा छडा नाही!या घटनेचे वृत्त कळताच पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली. पोलीस लाईनमध्ये शिरून पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला करणारे गुंड कोण असतील, असा प्रश्न सर्व विचारत आहेत. याप्रकरणी राठोड यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, २४ तास होऊनही गिट्टीखदान पोलिसांना आरोपींचा छडा लावण्यात यश आलेले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस