अस्वती दोरजे नागपूरच्या नव्या सहपोलीस आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:13 IST2021-08-24T04:13:08+5:302021-08-24T04:13:08+5:30

छेरिंग दोरजे उपमहानिरीक्षक म्हणून येणार नागपूर : गेल्या दीड वर्षापासून रिक्त असलेल्या सहपोलीस आयुक्तपदी अस्वती दोरजे यांची नियुक्ती झाली ...

Aswati Dorje is the new Joint Commissioner of Police, Nagpur | अस्वती दोरजे नागपूरच्या नव्या सहपोलीस आयुक्त

अस्वती दोरजे नागपूरच्या नव्या सहपोलीस आयुक्त

छेरिंग दोरजे उपमहानिरीक्षक म्हणून येणार

नागपूर : गेल्या दीड वर्षापासून रिक्त असलेल्या सहपोलीस आयुक्तपदी अस्वती दोरजे यांची नियुक्ती झाली आहे. गृह विभागाने सोमवारी राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीची यादी जाहीर केली. त्यानुसार दोरजे यांना नागपूर शहराच्या सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. छेरिंग दोरजे हे नागपूर परिक्षेत्राचे नवे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून बदलून येणार असून आतापर्यंत या पदावर असलेले चिरंजीव प्रसाद यांची राज्य राखीव पोलिस दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून मुंबईला बदली झाली आहे. दोरजे दाम्पत्याने यापूर्वी विदर्भात सेवा दिली आहे. छेरिंग दोरजे यांनी चंद्रपूर तर अस्वती दोरजे यांनी वर्धा येथे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पद्मभूषण व दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अदूर गोलाकृष्णन यांच्या अस्वती कन्या आहेत.

Web Title: Aswati Dorje is the new Joint Commissioner of Police, Nagpur