शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दारूचं का विचारता, मोहफुलांचे आहेत असंख्य फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:09 IST

नागपूर : मोहफुल म्हटले की त्यापासून तयार होणारी गावठी दारू हे समीकरण जणू गृहितच धरले गेले. या गृहितकामुळेच त्याच्या ...

नागपूर : मोहफुल म्हटले की त्यापासून तयार होणारी गावठी दारू हे समीकरण जणू गृहितच धरले गेले. या गृहितकामुळेच त्याच्या असंख्य पौष्टिक फायद्याकडे दुर्लक्ष करून गेल्या कित्येक वर्षांपासून मोहफुलांवर बंदी घातली गेली. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या आदिवासींना आर्थिक लाभ देणारे हे साधन हिरावले. आता मोहफुलांवरील बंदी उठविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आदिवासींना सीझनमध्ये आर्थिक फायदा मिळेल. सोबतच पर्यावरणपूरक प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळेल, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.

मोहफुलांवरील बंदी उठविण्यासाठी नागपूरचे डॉ. शांतिलाल कोठारी यांच्या नेतृत्वात २०-२५ वर्षांपासून लढा चालविला होता. त्यांच्या निधनानंतर का होईना या लढ्याला यश आल्याची भावना गडचिरोलीत कार्य करणारे डॉ. सतीश गोगुलवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, दारू केवळ मोहापासून बनते असे नाही. द्राक्षे, ऊस, संत्री याशिवाय तांदूळ, गव्हापासूनही दारू तयार केली जाते. मात्र यावर बंदी घातली गेली नाही. पण मोहफुलांवर बंदी घालणे अनाकलनीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या रिपोर्टनुसार मोहफुलांमध्ये द्राक्षांपेक्षा अधिक न्यूट्रिशन असते, शिवाय व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियमसाठीही मोहाचे महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे द्राक्षे किंवा संत्र्यांवर कीटनाशकांचा मारा असतो. पण मोह म्हणजे कोणतीही फवारणी न करता तयार झालेले शुद्ध नैसर्गिक खाद्य होय. मात्र केवळ दारूशी संबंध जोडून आदिवासी समाजाच्या शुद्ध खाद्याला दूर ठेवण्यात आल्याची खंत डॉ. गोगुलवार यांनी व्यक्त केली. काेराेना काळात राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी माेहफुलांचे महत्त्व समजले आहे.

एक कुटुंब गाेळा करते एक-दीड टन माेह

डाॅ़ गाेगुलवार यांनी सांगितले, गडचिराली भागात सीझनच्या वेळी बहुतेक कुटुंब माेहफुले गाेळा करतात. एक कुटुंब या १०-१२ दिवसाच्या काळात एक ते दीड टन माेहफुल गाेळा करतात. हे माेहफुल ४०-४५ रुपये दराने विकले जातात. म्हणजे सीझनमध्ये त्यांना २०-२५ हजाराचा धनलाभ हाेताे. मात्र खरेदी करणारे भीती दाखवून कमी दरात खरेदी करतात. बंदी उठविल्याने त्यांना कायदेशीरपणे ते विकता येईल. डाॅ. गाेगुलवार यांच्या पुढाकारातून काेरची भागात गावकऱ्यांना माेहफुल गाेळा करण्यासाठी प्रेरित केले. वनहक्क प्राप्त ग्रामसभा व वनधन विक्री केंद्राच्या माध्यमातून ते खरेदी करण्यात येत असून नागरिकांना आर्थिक लाभ मिळत आहे. आदिवासी समाजाद्वारे माेहफुल झाडाला ‘माऊली’ म्हणून ओळखले जाते. म्हणून त्यांनी या वृक्षांना जतन करून ठेवले आहे.

तरुण उद्याेजकांनी पुढे यावे

आदिवासींच्या अन्नात कायम माेहफुलांचा समावेश राहिला आहे. माेहापासून लाडू, मिठाई, ज्यूस आदी गाेष्टी तयार केल्या जातात. प्रक्रिया करून इतरही अनेक पाैष्टिक खाद्यपदार्थ तयार करता येतील. माेहफुलांसह इतर वनसंपदेसाठी प्रक्रिया उद्याेग स्थापन करून त्याचा प्रसार करता येईल. त्याची मार्केटिंग करून निर्यात करण्याची क्षमता निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे तरुण उद्याेजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डाॅ. गाेगुलवार यांनी केले.