शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा लॉकच राहिल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST

नागपूर : २३ नोव्हेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने शाळा, आश्रमशाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पण आदिवासी विकास ...

नागपूर : २३ नोव्हेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने शाळा, आश्रमशाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पण आदिवासी विकास विभागाने १ डिसेंबर रोजी शाळा सुरू करण्याचे परिपत्रक काढले होते. पण १ डिसेंबर रोजी आश्रमशाळा सुरू झाल्या नाहीत. विशेष म्हणजे शाळा कधी सुरू होईल, यासंदर्भात कुठलेही परिपत्रक काढले नाही, सूचना दिल्या नाहीत.

१ डिसेंबर रोजी आदिवासी विकास विभागाने शाळा सुरू होईल, यासंदर्भात परिपत्रक काढले. त्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले. आश्रमशाळेत कार्यरत शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर शाळा सुरू करण्याचे परिपत्रक पडले. पण अप्पर आयुक्त कार्यालयांतर्गत आश्रमशाळा कशा सुरू होतील, नियोजन कसे राहील, विद्यार्थ्यांची राहण्याची सोय, पालकांचे संमतीपत्र कसे मिळविता येईल यासंदर्भात कुठलेही नियोजन अथवा आढावा झाला नाही. त्यामुळे आश्रमशाळेतील शिक्षकांकडूनही शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न झाले नाहीत.

अखेर १ डिसेंबर आला. परिपत्रकाशिवाय काहीच नियोजन नसल्याने आश्रमशाळा लॉकच राहिल्या. यासंदर्भात काही आश्रमशाळा शिक्षकांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, १ डिसेंबरला विभागाचे आश्रमशाळा सुरू करण्याचे परिपत्रक व्हॉट्सअ‍ॅपवर आले. पण नियोजनाच्या बैठका, आढावे काहीच घेतले नाहीत. १ डिसेंबर रोजी शाळा उघडणार नाही, असेही पत्र काढले नाही. त्यामुळे आम्ही संभ्रमात आहोत.

- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू केल्या नाहीत

नागपूर प्रकल्प कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, आश्रमशाळा १३ डिसेंबरपर्यंत सुरू होणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. त्यामुळे आम्ही आश्रमशाळा बंद ठेवल्या आहेत. पण १३ डिसेंबरपर्यंत शाळा आश्रमशाळा बंद राहणार असे आदेश नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयांतर्गत ६ जिल्हे येतात. नागपूर प्रकल्प कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन केले. मात्र इतर प्रकल्प कार्यालयाला आश्रमशाळा सुरू करण्यासंदर्भात कुठल्याही सूचना नसल्याची माहिती आहे. विभागाने तसे पत्रही काढले नाही.