शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात महिला मुलींमध्ये दहशत पसरविणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 23:22 IST

शहरातील विविध भागात महिला मुलींचा विनयभंग करून प्रचंड दहशत निर्माण करणारा विकृत गुन्हेगार अंबाझरी पोलिसांनी अखेर पकडला. विजय दुधराम मेश्राम (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो वाडी (लावा) च्या महादेव नगरात विश्राम लॉनजवळ राहतो.

ठळक मुद्दे५० पेक्षा जास्त महिला-मुलींचा विनयभंग : अंबाझरी पोलिसांनी बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विविध भागात महिला मुलींचा विनयभंग करून प्रचंड दहशत निर्माण करणारा विकृत गुन्हेगार अंबाझरी पोलिसांनी अखेर पकडला. विजय दुधराम मेश्राम (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो वाडी (लावा) च्या महादेव नगरात विश्राम लॉनजवळ राहतो. महिला मुलींचा विनयभंग करण्याची विकृती त्याला जडलेली आहे. तो एका कंपनीत कामाला असून कामावर जाताना आणि परत येताना जीन्स पॅन्ट टी शर्ट घातलेल्या महिला मुलींच्या मागून जाऊन तो त्यांचा विनयभंग करतो आणि पळून जातो. त्याने अशा प्रकारे १० महिन्यात अंदाजे ४० ते ५० महिला मुलींची छेड काढलेली आहे. ३ जूनला रात्री ८ च्या सुमारास अंबाझरीतील एक तरुणी तिच्या भावासोबत रस्त्याने फिरत असताना आरोपी विजय मेश्राम याने तिची छेड काढली आणि पळून गेला. तरुणीने आरोपीच्या दुचाकीचा नंबर टिपला आणि पोलिसांमध्ये तक्रार नोंदविली. अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. काही तासात पोलिसांनी आरोपीचा पत्ता हुडकून काढला. शुक्रवारी आरोपी विजय मेश्रामला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.बदनामीच्या धाकामुळे अनेक गप्पविकृती जडलेला आरोपी विजय मेश्राम याने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबानुसार त्याने ते १० महिन्यात जयताळा, प्रतापनगर, शंकरनगर, आठ रस्ता चौक परिसर, भरतनगर, रामनगर अशा भागात सुमारे ४० ते ५० महिला मुलींचा विनयभंग केला आहे. अनेकींनी बदनामीच्या धाकामुळे त्याच्याविरुद्ध तक्रार दिली नाही. मात्र तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या दुचाकीचा क्रमांक एमएच ४०/ एडी २४३२ कळताच आरोपीच्या मुसक्या बांधण्यात यश मिळविले. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू, सहायक पोलीस आयुक्त विलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय करे, उपनिरीक्षक सचिन जाधव, फौजदार शरद मिश्रा, आशिष कोहळे, नायक अंकुश घाटी, श्रीकांत उईके, संतोष वानखेडे आणि सचिन बनसोड यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :MolestationविनयभंगArrestअटक