शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक ‘माझी’मेडिकलचा करंटेपणा : आजारी मुलाला

By admin | Updated: October 26, 2016 02:58 IST

पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालत जाणारा एक पती... अन् सोबत आईच्या मृत्यूने कळवळणारी त्यांची लहान मुलगी...

पाठीवर बसवून केला सहा कि. मी.चा प्रवाससुमेध वाघमारे नागपूर पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालत जाणारा एक पती... अन् सोबत आईच्या मृत्यूने कळवळणारी त्यांची लहान मुलगी... असे धक्कादायक चित्र ओडिशातील कालाहंडी येथे नुकतेच दिसले. या वृत्ताने समाजमन हळहळले. शासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढले गेले. मात्र शासकीय रुग्णालयांतील उपाययोजनांमध्ये बदल झाले नाहीत. मंगळवारी दाना माझी सारखाच एका बापाला मेडिकलने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. आॅटोला पैसे नसल्याने किडनीचा आजार असलेल्या पोटच्या गोळ्याला पाठीवर बसविले. एका साध्या तपासणीसाठी मेडिकल ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि परत अशी सहा किलोमीटरची पायपीट करावी लागली.कालाहंडी येथील दाना माझीची ती घटना २५ आॅगस्टची होती. आज मंगळवारची तारीख २५ आहे. केवळ महिना बदललेला आहे. मात्र घटना माझी सारखीच आहे. गडचिरोली येथे राहणारे मेरसू बारसागडे यांच्या घरची परिस्थिती बेताची. नेहमी हसत खेळत राहणारा त्यांचा आठ वर्षीय मुलगा आनंदला पोटात काही दिवसांपासून दुखत होते. गावातील डॉक्टरांना दाखविल्यावर त्यांनी नागपूरच्या मेडिकलमध्ये नेण्यास सांगितले. मुलाला भयंकर आजार झाला या विचारानेच हे कुटुंब हादरले. पैशांची जुळवाजुळव करून मेडिकल गाठले. डॉक्टरांनी आनंदला वॉर्ड क्र. ६ मध्ये भरती केले. किडनीचा आजार असल्याचे निदान झाले. हृदयविकाराचीही समस्याही समोर आली. त्याच्या तपासणीसाठी डॉक्टरांनी तीन किलोमीटर अंतरावरील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हृदयरोग विभागात ‘इको’ करण्यास सांगितले. हातात तशी चिठ्ठी दिली. परंतु रुग्णवाहिका दिली नाही. या कुटुंबासाठी नागपूर नवीन. रुग्णालयाबाहेर आल्यावर सुपर हॉस्पिटल कुठे आहे, हा प्रश्न पडला. आॅटोचालकाने ७० रुपये भाडे सांगितले. एवढे पैसे खर्च करणे परवडणारे नव्हते. म्हणून रस्ता विचारला. हाताला ‘इंट्राकॅथ’ लागलेल्या आनंदला पाठीवर बसविले आणि तीन किलोमीटरची पायपीट सुरू झाली. पाठीवर बसून आनंदच्या पोटात दुखत होते. त्याच्या मागून चालत असलेली त्याची आई धीर देत होती. हॉस्पिटलला पोहचल्यावर दोन तासांनी ‘इको’ झाला. मात्र तेथूनही त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. ती नि:शुल्क उपलब्ध असते याची कुणी माहितीही दिली नाही. यामुळे आनंदला पाठीवर बसविले. आणि पुन्हा पायपीट सुरू झाली.मेरसू बारसागडेसारखे अनेक विवश बाप या मार्गावर रोजच दिसतात. परंतू दोन्ही रुग्णालयासाठी या नेहमीच्या घटना झाल्याचे वास्तव आहे.