शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

नाराज आमदारांची वर्दळ वाढली

By admin | Updated: June 29, 2014 00:49 IST

जिल्हा परिषदेतील गटातटाच्या राजकारणात नाराजीमुळे गेल्या दोन वर्षात आमदार फारसे फिरकत नव्हते. परंतु याचा दगाफटका विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता विचारात घेता या नाराज

जिल्हा परिषद : निवडणुकीपूर्वी भूमिपूजन आटोपण्याचा प्रयत्न नागपूर : जिल्हा परिषदेतील गटातटाच्या राजकारणात नाराजीमुळे गेल्या दोन वर्षात आमदार फारसे फिरकत नव्हते. परंतु याचा दगाफटका विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता विचारात घेता या नाराज आमदारांची मागील काही दिवसात जि.प.मध्ये वर्दळ वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी जि.प.मध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व गोंडवाना गणतंत्र पार्टी अशी आघाडी सत्तेत आली. सत्तेत सहभागी घटक पक्षात समन्वय ठेवण्याची जबाबदारी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपविण्यात आली होती. सुरुवातीला त्यांनी बैठकाही घेतल्या परंतु पुढे-पुढे त्यांचा कारभारात हस्तक्षेप वाढला होता. वाढता हस्तक्षेप म्हणजे आपल्या अधिकारावर अतिक्र मण असल्याची भावना पदाधिकाऱ्यांत निर्माण झाली होती. यातूनच अध्यक्ष संध्या गोतमारे यांच्यासह सत्तापक्षातील काही सदस्यांनी यावर नाराजी व्यक्त केली.आ.सुधीर पारवे यांच्याही बाबतीत तेच घडले. यातून वाद वाढल्याने दोघेही जि.प.कडे फारसे फिरकत नव्हते.जि.प.च्या माध्यमातून रस्ते दुरुस्ती, दलित वस्ती सुधार, पांदण रस्ते, तलाव व बंधारे दुरुस्तीसह वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा थेट संबंध येत असल्याने जि.प. हे एक जनसंपर्काचे प्रभावी माध्यम आहे. परंतु गटातटाच्या राजकारणामुळे सदस्यांत असंतोष आहे. सत्ता पक्षातील सदस्यांचीच कामे होत नसल्याच्या तक्र ारी आहेत. गेल्या दोन वर्षात लघु सिंचनाची कामे ठप्पच आहेत. दुरवस्था होऊनही रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. वैयक्तिक लाभाच्या योजनाही कागदावरच असल्याने ग्रामीण भागात नाराजी आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले. ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जि.प.ने शासनाकडे दुरुस्तीसाठी १५० कोटींची मागणी केली. शासनाकडून ३२ कोटीचा निधी मिळाला आहे. यातून १६ कोटींची कामे आमदारांच्या सूचनेनुसार केली जाणार आहेत. परंतु पावसाळ्यानंतरच या कामांना सुरुवात होणार असल्याने आमदार अस्वस्थ आहेत. किमान निवडणुकीपूर्वी भूमिपूजनाचे श्रेय मिळाले तर लोकांची नाराजी दूर करता येईल असा त्यांचा प्रयत्न आहे.समाजकल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजनेतूनही जिल्ह्यात १८ ते २० कोटींची कामे होत आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीकडूनही २६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही कामे निवडणुकीपूर्वी झाली तर त्याचा निवडणुकीत लाभ होईल असा अंदाज आहे. परंतु पावसाळ्यात कामे होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी आता समन्वयावर भर दिला आहे. (प्रतिनिधी)