शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मृतांच्या डीएनए सॅम्पलचे विश्लेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नरेश डोंगरे। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनैतिक संबंधामुळे निर्माण झालेल्या विकृतीतून घडलेल्या पाचपावलीच्या हत्याकांडातील अनेक नाजूक मुद्दे अजून ...

नरेश डोंगरे।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनैतिक संबंधामुळे निर्माण झालेल्या विकृतीतून घडलेल्या पाचपावलीच्या हत्याकांडातील अनेक नाजूक मुद्दे अजून गुलदस्त्यातच आहेत. त्याचा उलगडा करण्यासाठी आरोपीसह सहाही मृतांचे डीएनए सॅम्पल घेऊन पोलिसांनी ते विश्लेषणासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे पाठविले आहेत. यातून पोलीस आरोपी, तसेच मृतांच्या नात्यातील गुंतागुंत तपासणार आहेत.

पाचपावलीतील बागल आखाड्याजवळच्या भागात भिशीकर यांच्या घरी राहणारा क्रूरकर्मा आलोक ऊर्फ चंदू अशोक मातूरकर याने त्याची मेव्हणी अमिषा, सासू लक्ष्मीबाई बोबडे, पत्नी विजया, मुलगी परी आणि साहिल नामक मुलाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या थरारक हत्याकांडाने समाजमन सुन्न झाले आहे. हत्याकांड उघडकीस आल्यानंतर ते घडवून आणणारा आरोपीही परिस्थितीजन्य पुराव्यावरून उजेडात आल्यामुळे आणि त्याने स्वतःला संपवून घेतल्यामुळे पोलिसांना या हत्याकांडात आता फक्त तपासाची कागदोपत्री प्रक्रियाच पूर्ण करावी लागणार आहे. मात्र, या प्रकरणाने माणसातील पाशवी वृत्तीला अधोरेखित केल्यामुळे पोलिसांसाठी हे प्रकरण ‘रिसर्च बेस स्टोरी’ ठरले आहे. आरोपी आलोकचे त्याची मेव्हणी अमिषासोबत अनैतिक संबंध होते. हे दोघे नेहमीच शरीरसंबंध प्रस्थापित करायचे, हे उघड झाले आहे. अमिषा स्वैराचारी बनल्यामुळे आलोक सैतान बनल्याचेही उघड झाले आहे. परिस्थितीजन्य पुराव्यावरून पोलिसांनी हा निष्कर्ष काढला असला तरी यामागे आणखी काही वेगळी ‘स्टोरी’ असावी असेही काही पोलीस अधिकाऱ्यांचे मत आहे. त्याचमुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सायंटिफिक पद्धतीने करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी आरोपी आलोक, तसेच अन्य पाच मृतांचे डीएनए सॅम्पल घेतले आहेत. ते तज्ज्ञांकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहे. आलोकच्या डोक्यात पत्नी आणि मुलांबाबत दुसरा काही संशय होता का, मृत विजया आणि अमिषा या दोघी किंवा दोघींपैकी कुणी गर्भवती होते का, हे आणि आणखीही असेच काही नाजूक पैलू पोलीस डीएनए टेस्टच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

---

बलात्काराचा उल्लेख नाही

या हत्याकांडाला आता तीन दिवस झाले. मात्र, डॉक्टरांकडून पोलिसांना अजून फायनल पीएम रिपोर्ट मिळालेला नाही. डॉक्टरांनी प्रायमरी रिपोर्ट दिला, त्यात चौघांचा मृत्यू गळा कापल्यामुळे, तर साहिलचा मृत्यू तोंडावर उशी दाबल्याने श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे.

अमिषाचा मृतदेह पोलिसांना नग्नावस्थेत आढळला. तिचे आणि आरोपीची अंतर्वस्त्रे बाजूला पडून होती. त्यावरून त्याने अमिषाशी शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी काढला आहे. मात्र, प्रायमरी रिपोर्टमध्ये बलात्कार किंवा शरीरसंबंध याबाबतचा खुलासा झालेला नाही. फायनल रिपोर्टमध्ये त्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ आपले मत नोंदविणार असल्याचे समजते.

---