शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मधूर स्वरशब्दांची अमृतवर्षिणी मैफिल

By admin | Updated: July 3, 2014 00:59 IST

अभिजात शास्त्रीय संगीतातील राग, रागिण्यांमध्ये विविध भावनांचा समुच्चय स्वरांच्या माध्यमातून केला आहे. शास्त्रीय रागांवर आधारित गीतेही त्या रागाचे सौंदर्य घेऊन जन्माला येतात.

रंगबावराचे आयोजन : शास्त्रीय रागसंगीतावर आधारित गीतांचे सादरीकरण नागपूर : अभिजात शास्त्रीय संगीतातील राग, रागिण्यांमध्ये विविध भावनांचा समुच्चय स्वरांच्या माध्यमातून केला आहे. शास्त्रीय रागांवर आधारित गीतेही त्या रागाचे सौंदर्य घेऊन जन्माला येतात. त्यामुळे ही गीतेही जाणकार रसिकांच्या मनातच घर करतात. अशाच सरस अनुभूतीच्या ‘अमृतवर्षिणी’ या अनोख्या मैफिलीचे आयोजन रंगबावरा संस्थेतर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे पार पडला. श्रोत्यांच्या कानावर हळुवार मोरपीस फिरविणारी विविध रागातील गीतांनी, बंदिशींनी यावेळी रसिकांचा ताबा घेतला. अनेकदा ऐकलेली, आवडीची आणि भावपूर्ण शब्दांची ही गीते नेमकी कोणत्या रागातील आहे, हे यावेळी सहजतेने उलगडत असल्याने रसिकांना ही मैफिल आनंदपर्वणी होती. सायली आचार्य, सुजाता व्यास या प्रतिभावंत गायिकांनी यावेळी शास्त्रीय संगातातील अर्थभावपूर्ण बंदिशी तर विवेक देशपांडे, अजय देवगावकर यांनी हिंदी-मराठी गीतांचे सुरेल सादरीकरण करून उपस्थितांना आनंद दिला. यावेळी शिरीष भालेराव यांनी व्हायोलिनवर काही रागातील रचना सादर करून आपल्या वादनाचा परिचय दिला. बालपणापासून स्वर शब्दांच्या उद्यानात बागडण्याचे भाग्य लाभलेल्या सुपरिचित गायिका सायली आचार्य या युवा गायिकेने राग मधुवंतीने गायनाला प्रारंभ केला. प्रख्यात गायक पं. कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे यांच्या खास मित्रभावातील सांगितिक संवादावर कुमारजींनी रचलेल्या ‘मै आऊ तेरे मंदरवा...’ व द्रुत लयीतील ‘जाऊ बलिहारी तोपे ना...’ या बंदिशीसह ‘रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे...’ हे गीतही सायलीने तयारीने सादर केले. याशिवाय राग नंदमधील कुमारजींनी रचलेली बंदिश व तराणा तर ‘तू जहां जहां चलेगा...’ हे सिनेगीत सादर करून तिने रसिकांची दाद घेतली. संगीतातील जाणत्या गायिका सुजाता व्यास यांनी राग यमनकल्याणमधील पारंपरिक बंदिश ‘अवगुन न किजीए...’ तर विवेक देशपांडे यांनी ‘वो शाम कुछ अजीब थी...’ हे गीत सादर केले. सुजाता यांनी ‘नीर भरन कैसे जाऊ अब...’ ही रसिली ठुमरी, बंदिश, तराणा आणि त्यावरील अजय देवगावकर यांनी सादर केलेले ‘जिया जरत रहत दिन रैन वो रामा...’ सादर करून दाद मिळविली. शिरीष भालेराव यांनी व्हायोलिनवर राग गौडमल्हारमधील बंदिश, सुरेलतेने सादर करून राग मेघमल्हारमधील बंदिशही पेश केली. सुजाता व्यास यांनी डॉ. बाळासाहेब पुरोहित यांनी रचलेली राग चारुकेशीतील बंदीश ‘लाग रही सुरसे प्रित..’ तयारीने सादर केली. अजयने संत नामदेव महाराजांच्या अभंगाच्या भैरवीने या कार्यक्रमाचे समापन केले. या मैफिलीचे निवेदन अधिश्री देशपांडे आणि अनुराधा देशपांडे यांनी केले. गायकांना ओंकार वैद्य-तबला, अजय गोसावी व भाविक मणियार-संवादिनी, उज्ज्वला गोकर्ण - सहतालवाद्य आणि परिमल जोशी यांनी सिंथेसायझरवर साथसंगत केली.(प्रतिनिधी)