शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
3
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
4
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
5
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
6
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
7
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
8
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
9
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
10
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
11
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
12
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
13
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
14
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
15
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
16
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
17
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
18
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
19
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
20
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात युतीची सरशी, आघाडीचे पानिपत

By admin | Updated: May 17, 2014 00:35 IST

देशातील इतर भागाप्रमाणेच विदर्भातही मोदी लाटेच्या झंझावातात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पराभवाचे तोंड पाहावे लागले. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत विदर्भातील सर्व १0 मतदारसंघ ...

मोदी लाट : गडकरी, अडसूळ, धोत्रे, अहीर, भावना गवळी, पटोले, तुमाने, नेते, जाधव विजयी

नागपूर : देशातील इतर भागाप्रमाणेच विदर्भातही मोदी लाटेच्या झंझावातात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पराभवाचे तोंड पाहावे लागले. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत विदर्भातील सर्व १0 मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीने जिंकून काँग्रेस आघाडीचे पानिपत केले.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडे नागपूर, रामटेक, वर्धा, चिमूर-गडचिरोली व भंडारा हे मतदारसंघ होते. यंदा युतीने मात्र सर्व जागा बळकावल्या आहेत. नागपूरकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. येथे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि काँग्रेस आघाडीचे विलास मुत्तेमवार यांच्यात सरळ लढत झाली. प्रथमच नागपूर लोकसभा मतदारसंघातून गडकरी विजयी झाले आहेत. त्यांनी ५ लाख ८७ हजार ७६७ मते घेत मुत्तेमवार यांचा २ लाख ८४ हजार ८२८ मतांनी पराभव केला. मुत्तेमवार यांना ३ लाख २ हजार ९३९ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे प्रतिष्ठेचा समजला जाणारा भंडारा-गोंदिया मतदारसंघदेखील आघाडीच्या हातून निसटला आहे. भाजप-शिवसेना युतीचे नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा १ लाख ४९ हजार ८३६ मतांनी पराभव केला आहे. पटोले यांना ६ लाख ६ हजार ६८६ मते व पटेल यांना ४ लाख ५६ हजार ८५0 मते मिळाली आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातून राहुल ब्रिगेडचे सदस्य व माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा पराभव शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी केला. तुमाने यांनी ५ लाख १९ हजार ८९२ मते घेत १ लाख ७५ हजार ७९१ मतांची आघाडी घेतली आहे, तर वासनिक यांना ३ लाख ४४ हजार १0१ मते प्राप्त झाली आहेत.