शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 09:18 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अपघातग्रस्त विमानाचा पायलट अनुभवी असूनही त्यांना आपत्कालीन स्थितीत विमान उतरविण्यासाठी वेळच मिळाला नाही. ही घटना जर काही हजार फूट उंचीवर झाली असती, तर पायलटकडे अनेक पर्याय असते, असे मुंबईतील जेटफ्लीट एव्हिएशनचे संस्थापक व एव्हिएशन तज्ज्ञ शनिल देसाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

- फहीम खाननागपूर - अपघातग्रस्त विमानाचा पायलट अनुभवी असूनही त्यांना आपत्कालीन स्थितीत विमान उतरविण्यासाठी वेळच मिळाला नाही. ही घटना जर काही हजार फूट उंचीवर झाली असती, तर पायलटकडे अनेक पर्याय असते, असे मुंबईतील जेटफ्लीट एव्हिएशनचे संस्थापक व एव्हिएशन तज्ज्ञ शनिल देसाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ते म्हणाले की, उड्डाणापूर्वी नेहमीच ‘अरायव्हल टेस्ट’ केली जाते. हे विमान सकाळीच दिल्लीहून अहमदाबादला पोहोचले होते. त्यामुळे हे टेस्टिंग झाले असणार. मात्र टेकऑफनंतर लगेचच काही तांत्रिक बिघाड झाला असावा.

विमान चालविणारे कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडे ८२०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. उड्डाणानंतर अवघ्या एका मिनिटात, १:३९ वाजता त्यांनी  ‘मे डे’ कॉल दिला, पण त्यानंतर विमानाचा एटीसीशी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्क तुटला. अशा स्थितीत विमान वाचविण्यासाठी सभरवाल  यांना फार काहीही करता येणे  शक्यच नव्हते. 

‘विमानाचे लँडिंग गिअर आत घेतले नव्हते’सर्वात धक्कादायक बाब म्हणजे टेकऑफ झाल्यानंतर ५ मिनिटे झाली, तरीही विमानाचे लँडिंग गिअर आत घेतले गेले नव्हते. हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणानंतर सामान्यतः १०–१५ सेकंदांच्या आत हे गिअर आत घेतले जातात. मात्र गिअर बाहेरच राहणे ही गंभीर तांत्रिक अडचण असू शकते. ही संपूर्ण घटना डीजीसीए (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) आणि एएआय (एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया) यांच्या सखोल चौकशीचा विषय आहे असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादGujaratगुजरात