शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघात टाळण्यासाठी ‘अहमदाबाद पॅटर्न’

By admin | Updated: May 10, 2015 02:17 IST

उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघातामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघातामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावर आळा घालण्यासाठी अहमदाबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात सर्वप्रथम नागपूर शहरात उष्माघात कृती आराखडा (हिट अ‍ॅक्शन प्लॅन) राबविला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी शनिवारी दिली. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मनपाचे आरोग्य उपसंचालक मिलिंद गणवीर उपस्थित होते.मागील काही वर्षांत उन्हाळ्यात झालेले मृत्यू व त्या दिवसाचे तापमान याची माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. नोव्हेंबर २०१५ पर्यंत कृती आराखडा तयार करून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्याचे सादरीकरण केले जाईल. गरज भासल्यास त्यात आवश्यक सुधारणा करून तो २०१६ च्या उन्हाळ्यात लागू केला जाईल. नागपूरपाठोपाठ राज्यातील चंद्रपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, जळगाव, बीड व नांदेड आदी शहरातही हा आराखडा राबविला जाणार आहे. कृती आराखडा तयार करताना हवामान, पोलीस विभाग, बांधकाम व पर्यावरण क्षेत्रातील संघटना, शासकीय व खासगी वैद्यकीय संस्था यांचे सहकार्य घेतले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.तापमानाचा त्रास विचारात घेता सूतिकागृहात नवजात शिशू विभाग, गरोदर महिलांचा वॉर्ड इमारतीच्या वरच्या माळ्यावर असू नये, अशा स्वरूपाच्या सूचना महापालिक ांना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागामार्फत तापमानाची माहिती दिली जाते. पुढील आठवड्याच्या संभाव्य तापमानावरून गरज भासल्यास आरोग्य विभागामार्फत लोकांना खबरदारीच्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती सौनिक यांनी दिली.(प्रतिनिधी)