शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅग्रो कंपनीच्या वाहन चालकाची बनवाबनवी , सव्वासात लाखांचे घेतले डिझेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 20:20 IST

कंपनीचे व्हाऊचर बुक चोरून त्याआधारे पेट्रोल पंपावरून कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने अवघ्या ३४ दिवसांत सव्वासात लाखांचे डिझेल घेतल्याची धक्कादायक बाब उजेडात आली.

ठळक मुद्देनागपूर एमआयडीसीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कंपनीचे व्हाऊचर बुक चोरून त्याआधारे पेट्रोल पंपावरून कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने अवघ्या ३४ दिवसांत सव्वासात लाखांचे डिझेल घेतल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. ही बनवाबवनी उघड झाल्यानंतर कंपनीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी वाहनचालक संतोषकुमार दुबे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.एमआयडीसीतील झोन चौकात मुरली अ‍ॅग्रो कंपनी आहे. येथे आरोपी दुबे वाहनचालक म्हणून कामावर होता. पेट्रोल पंपाच्या संचालकांसोबत असलेल्या करारानुसार, कंपनीच्या वाहनात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी रोख रकमेऐवजी व्हाऊचर द्यावे लागत होते. ते ध्यानात आल्यामुळे दुबे याने कंपनीचे एक व्हाऊचर बुक चोरले. त्याआधारे त्याने १ सप्टेंबर २०१९ ते ४ ऑक्टोबर २०१९ याकालावधीत तब्बल ६,४०० लिटर डिझेल हिंगणा नाक्यावरील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावरून भरून घेतले. तो रोज २०० ते ४०० लिटर इंधन भरायचा. दुबे आणि साथीदारांची बनवाबनवी लक्षात आल्यानंतर कंपनी प्रशासनाने त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सात लाख १४ हजारांचे इंधन उचलणारा दुबे विचारपूस करताच गायब झाल्याने कंपनीतर्फे राहुल नामदेव बोरकर (वय २८) यांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. चौकशीअंती हवालदार विजय नेमाडे यांनी बुधवारी आरोपी दुबेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.आरोपी उत्तर प्रदेशात पळालाआरोपी दुबे मूळचा गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. त्याची बनवानबवी ७ ऑक्टोबरला कंपनीतील अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्याला यासंबंधाने त्यादिवशी जुजबी विचारपूस करण्यात आली. आपले बिंग फुटणार याची कल्पना येताच दुबेने आपला पगार उचलला आणि दुसऱ्या दिवशीपासून कामावर येणे बंद केले. तो त्याच्या मूळगावी, उत्तर प्रदेशमध्ये पळून गेला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी