पिराया येथे कृषिदिन थेट बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:06 IST2021-07-03T04:06:59+5:302021-07-03T04:06:59+5:30

उमरेड : हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती तथा कृषिदिनाचे औचित्य साधून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत कृषिदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ...

Agriculture Day at Piraya directly on the dam | पिराया येथे कृषिदिन थेट बांधावर

पिराया येथे कृषिदिन थेट बांधावर

उमरेड : हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती तथा कृषिदिनाचे औचित्य साधून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत कृषिदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वसंतराव नाईक मानवी विकास संशोधन प्रशिक्षण संस्था, तालुका कृषी कार्यालय, राष्ट्रपिता फाउंडेशन यांच्यातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन पिराया येथे केले गेले. या प्रसंगी खंडविकास अधिकारी जयसिंग जाधव, एकनाथ पवार, कृषी सहायक अरुण हारोडे, सरपंच राजकुमार राऊत, बंडू शिंदे, अभियंता जयसिंग पाटील, मनीष शिंगणे, आदींची उपस्थिती होती. यावेळी औषधी फळझाडांचे नि:शुल्क वितरण केले गेले. कार्यक्रमाच्या निमित्ताने देवानंद ठाकरे, नथ्थूजी तळेकर, ज्ञानेश्वर झाडे, राजकुमार राऊत, भास्कर झाडे, किशोर ठाकरे, कल्पना झाडे, आदी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निखिल भोयर, सुनील चव्हाण, संजय ठाकरे, आकाश झाडे, परमेश्वर भुसारी, वैभव भोयर, तेजस वाघमारे, आदींनी सहकार्य केले.

फोटो : कृषी सहायक अरुण हारोडे शेतकऱ्यांचा सत्कार करताना.

Web Title: Agriculture Day at Piraya directly on the dam