शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एका बिबट्याचे चामडे सापडले

By admin | Updated: September 17, 2014 00:54 IST

भिवापूर येथील एका शेतातील झुडपात पुन्हा एका बिबट्याचे चामडे सापडल्याची घटना पुढे आली आहे. माहिती सूत्रानुसार भिवापूरपासून काहीच अंतरावरील एका आयटीआयच्या पाठीमागे

वन विभाग हादरला : शिकारी टोळी सक्रिय नागपूर : भिवापूर येथील एका शेतातील झुडपात पुन्हा एका बिबट्याचे चामडे सापडल्याची घटना पुढे आली आहे. माहिती सूत्रानुसार भिवापूरपासून काहीच अंतरावरील एका आयटीआयच्या पाठीमागे असलेल्या पुष्मा विश्वेकार यांच्या शेतात ते चामडे आढळून आले. विश्वेकार यांचा नोकर हा शेतात काम करीत असताना त्याला ते सर्वप्रथम दिसून आले. त्यावर नोकराने लगेच शेतमालकाला माहिती दिली. शेतमालकाने पोलिसांना कळविले आणि पोलिसांनी वन विभागापर्यंत माहिती पोहोचविली. त्यावर भिवापूर येथील वनपाल वलधरे आपल्या काही वनमजुरांसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर झुडपातील ते बिबट्याचे चामडे ताब्यात घेऊन सध्या ते भिवापूर येथील वन कार्यालयात ठेवण्यात आले असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच चार दिवसांपूर्वी गत १२ सप्टेंबर रोजी येथेच एका आरोपीला बिबट्याच्या चामड्यासह अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता पुन्हा दुसरे चामडे आढळून आले आहे. लागोपाठ उघडकीस आलेल्या या दोन्ही घटनांनी वन विभाग चांगलाच हादरला आहे. गत चार दिवसांपासून पहिल्या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावण वाघमारे अजूनपर्यंत वन विभागाच्या हाती लागलेला नाही. अशास्थितीत ही दुसरी घटना पुढे आली आहे. यावरून या परिसरात शिकाऱ्यांची टोळी सक्रिय असून, त्यांनी आजपर्यंत किती वाघ व बिबट्यांचा बळी घेतला असावा, अशी भीती व्यक्त केल्या जाऊ लागली आहे. या दोन्ही घटना उमरेड-कऱ्हांडला या अभयारण्याशेजारी घडलेल्या आहेत. त्यामुळे शिकार झालेले बिबट याच अभयारण्यातील तर नाही ना? अशी शंका सर्वत्र उपस्थित केली जाऊ लागली आहे. (प्रतिनिधी)वन अधिकारी आरोपीला सोडून खबऱ्याच्या शोधात पहिल्या घटनेतील मुख्य आरोपी श्रावण वाघमारे अजूनपर्यंत वन विभागाच्या हाती लागलेला नाही. वन विभागाने दक्षिण-उमरेड येथील वन परिक्षेत्र अधिकारी बेलेकर यांच्यावर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची धुरा दिली आहे. परंतु माहिती सूत्रानुसार बेलेकर यांनी आरोपींचा शोध घेण्याचे सोडून गुप्त माहिती देणाऱ्या खबऱ्याचा पाठलाग सुरू केला आहे. यात मंगळवारी काही वन अधिकाऱ्यांनी खबऱ्याच्या घरी पोहोचून त्याचे बयाणही नोंदविले असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, एकीकडे वन विभाग गुप्त माहिती देणाऱ्या खबऱ्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहित करीत असताना, या प्रकरणात मात्र खबऱ्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. चौकशी अधिकाऱ्याच्या या प्रतापामुळे संपूर्ण प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे. या प्रकरणातील खबऱ्याने मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांना गुप्त माहिती दिली होती. त्याआधारे वन विभागाला आरोपी रणजितसिंग जुनी याला चामड्यासह अटक करण्यात यश मिळाले. परंतु आता तोच वन विभाग आरोपीला सोडून माहिती देणाऱ्या खबऱ्याच्या पाठीमागे लागला असल्याचे हाते यांनी सांगितले. यातून फार चुकीचा संदेश जाणार असून, वन विभागाला भविष्यात अशी गुप्त माहिती मिळणे बंद होईल, असेही ते म्हणाले. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आरएफओ बेलेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.