शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतर काँग्रेसमध्ये गटबाजीचे चक्रीवादळ

By admin | Updated: March 2, 2017 02:25 IST

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता अंतर्गत गटबाजीचे चक्रीवादळ उठले आहे.

राऊत व मुत्तेमवार- ठाकरे समर्थक आमने सामने : एकमेकांविरोधात मोर्चेबांधणी नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता अंतर्गत गटबाजीचे चक्रीवादळ उठले आहे. समर्थकांना हाताशी धरून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसचा गड असलेल्या उत्तर नागपुरात भाजपाने घवघवीत यश मिळविले. मुत्तेमवार- ठाकरे समर्थकांनी याचे खापर माजी मंत्री नितीन राऊत यांच्यावर फोडले असून राऊत यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी केली आहे तर, राऊत समर्थकांनी माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत यांच्यामुळेच पराभव झाल्याचा आरोप केला आहे. नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व उत्तर नागपूरचे प्रभारी बंडोपंत टेंभुर्णे, धरमकुमार पाटील, सुरज आवळे, मीना यादव, अन्सारी साहिना अंजू, अतिक मलिक, अंबादास गोंडाणे, मालिनी खोब्रागडे, बाबी दहिवले, नितीन इंदूरकर, प्रीती भाल, अनिता फ्रान्सिस यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत राऊत यांच्यावर तोफ डागली. राऊत यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. पक्षविरोधी कारवाई केली, असा आरोप करीत त्यांना पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी केली. धरमकुमार पाटील यांनी सांगितले की, राऊत यांनी मर्जीतील उमेदवारांना तिकीट न मिळाल्यामुळे अधिकृत उमेदवारांना पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे केले. प्रभाग ६ मध्ये अपक्ष उमेदवार निरंजनकुमार रामटेके यांच्या बॅनरवर राऊत यांचा फोटो होता. शिवाय त्यांच्या प्रचार गाड्यांवरही राऊत यांनी स्वत:चा फोटो लावून प्रचार केला. राऊत यांनी काँग्रेस उमेदवाराविरोधात गुप्त बैठका घेतल्या. याबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी व प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे राऊत समर्थक महामंत्री संजय दुबे, ठाकूर जग्यासी, एस.एस. पाटील, आर.जी. राणा, दिलीप घोरपडे, विजय तेलंग, डॉ. निशिकांत मोरे, नीरज चौबे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करीत विलास मुत्तेमवार व विकास ठाकरे यांना लक्ष्य केले. मुत्तेमवार-ठाकरे यांनी उमेदवारांची एकतर्फी निवड केली. दिखाव्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या. वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन दोन-तीन लोकांनीच उमेदवारांचे नाव निश्चित केले. २२ जागांवर डबल ए-बी फॉर्म वितरित करण्यात आले.