शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सल्ला देणारे घेताहेत शुल्क

By admin | Updated: November 19, 2016 03:09 IST

केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर अनेकजण काळा पैसा पांढरा करण्यासाठी चार्टर्ड अकाऊटंटचा (सीए) सल्ला घेत आहेत.

चार्टर्ड अकाऊंटंटच्या वेगवेगळ्या सेवा : अनेकांचा पक्षकारांना नि:शुल्क सल्ला, चार्टर्ड अकाऊंटंटचा सूरनागपूर : केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर अनेकजण काळा पैसा पांढरा करण्यासाठी चार्टर्ड अकाऊटंटचा (सीए) सल्ला घेत आहेत. सीए पक्षकारांना वेगवेगळ्या सेवा देतात. गुंतवणुकीविषयक सल्ला देणारे सीए लोकांकडून सेवा शुल्क घेतात. पण आयकर, विक्रीकर, सेवाकर आणि आॅडिट संदर्भात सेवा देणारे सीए सल्ला देताना पक्षकाराकडून सेवा शुल्क घेत नसल्याचा सूर सीएंनी लोकमतशी बोलताना काढला.नागपुरात दोन हजार सीए कार्यरत आहेत. सर्वजण वेगवेगळ्या सेवा पक्षकांराना प्रदान करतात. बहुतांश सीए आयकर, विक्रीकर, सेवाकर आणि आॅडिट संदर्भात व्यावसायिक आणि वैयक्तिक सेवा देतात. असे सीए सेवा दिल्यानंतरच शुल्क आकारतात. हे शुल्क मासिक, सहामाही किंवा वार्षिक असते. सीए संस्थेचे माजी अध्यक्ष जुल्फेश शाह यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनातून बंद केल्यानंतर अनेकांनी सीएंकडे धाव घेतली. त्यांना पैसा बँकेत भरण्याचा सल्ला देत आहे. यासाठी शुल्क आकारण्यात येत नाही. व्यावसायिक आणि वैयक्तिक सल्ला मागितला आहे. बहुतांश आमचे पक्षकार आहेत. त्यांच्याकडून शुल्क आकारले तर चुकीचा संदेश बाहेर जाईल आणि सीएंवर आरोप होतील. पण गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या सीएंनी शुल्क आकारले तर त्यात काहीच चूक नाही. गुंतवणूक सल्ला देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. सल्ल्याचे शुल्क त्यांनी निश्चितच आकारावे. आम्ही शुल्क आकारत नाही. नामांकित सीए शिरीष भगत यांनी सांगितले की, प्रत्येकाची पॅ्रक्टिस वेगळी आहे. गेल्या १० दिवसांत अनेकांचे फोन आले तर काहींनी व्यक्तिगत भेट घेऊन गुंतवणुकीचा सल्ला मागितला. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर इतरत्र गुंतवणूक करू नये, असा सल्ला पक्षकारांना दिला आहे. जुन्या नोटांनी सोन्याची खरेदी बंद आहे. सर्वोत्तम म्हणजे त्यांनी त्यांच्याकडील रक्कम थेट बँकेत जमा करावी, असे सांगत आहोत. काही दिवसानंतर आयकर खात्याची नोटीस आल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यासाठी पक्षकारांकडून निश्चित शुल्क आकारले जाईल, असे भगत यांनी स्पष्ट केले. सीए विजय शिंदे यांनी सांगितले की, अशा स्थितीत गुंतवणूक सल्ला देणाऱ्या सीएंव्यतिरिक्त आम्ही पक्षकारांकडून सेवा शुल्क आकारत नाही. अनेकजण काळ्या पैशाच्या गुंतवणुकीवर सल्ला घेण्यासाठी येत आहेत. त्यांना सल्ला देत आहोत. पण त्यांच्याकडून शुल्क आकारण्यात येत नाही. पक्षकाराला वर्षभर सेवा देताना आम्हाला सेवा शुल्क मिळते. (प्रतिनिधी)