शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएस्सी’नंतर घेता येणार अभियांत्रिकी द्वितीय वर्षाला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात व एकूण प्रक्रियेत मोठे बदल ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात व एकूण प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहे. बारावीत कमी गुण मिळाल्यामुळे अनेक जण नाईलाजाने विज्ञान शाखेत प्रवेश घेतात. मात्र अशा विद्यार्थ्यांचेदेखील अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. ‘बीएस्सी’ झाल्यानंतरदेखील आता थेट अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला प्रवेश मिळू शकणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाने दिशानिर्देशदेखील जारी केले आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पदवी प्रणालीतदेखील बदल करण्याच्या मुद्दयांचा अंतर्भाव आहे. त्याचाच आधार घेत नागपूर विद्यापीठात यासंदर्भात बदल करण्याची सुरुवात झाली आहे. याअंतर्गतच हे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. याअगोदर तंत्रनिकेतन पदविका मिळविलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळायचा. आता त्यात ‘बीएस्सी’ पदवीधारकांनादेखील संधी देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना द्यावी लागणार परीक्षा

पदविका अभ्यासक्रमातून द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ‘सीजीपीए’ त्याच वर्षीपासून ग्राह्य धरण्यात येतील. त्यांना प्रथम वर्षाच्या कुठल्याही विषयाची परीक्षा देण्याची गरज नसेल. मात्र ‘बीएस्सी’ करून मग द्वितीय वर्षात येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातील ‘इंजिनिअरिंग ग्राफिक्स-१’, ‘बेसिक्स ऑफ सिव्हील अ‍ॅन्ड मेकॅनिकल इंजिनिअरिंग’, ‘बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’, ‘कॉम्प्युटेशनल स्कील्स’, ‘इंजिनिअरिंग मेकॅनिक्स’ यापैकी अभ्यासक्रमनिहाय विषयांची परीक्षा द्यावी लागेल.

पदवीचे प्रारूप बदलणार

नवीन बॅचपासून पदवीचे प्रारूपदेखील बदलणार आहे. ‘डिग्री विथ मायनर’, ‘डिग्री विथ मेजर’ व ‘डिग्री विथ ऑनर्स’ यापैकी एक पदवी मिळणार आहेत. ‘ऑनलाइन’ माध्यमातून १८ ते २० अतिरिक्त ‘क्रेडिट्स’ मिळविल्यानंतर ‘डिग्री विथ मायनर’ अथवा ‘डिग्री विथ मेजर’ मिळू शकेल. संबंधित शाखांचा यामाध्यमातून अतिरिक्त अभ्यास करता येईल.

अशा असणार अभियांत्रिकीच्या पदवी

डिग्री विथ मायनर:चार वर्षीय अभ्यासक्रमासह इतर विद्याशाखेतील १८ ते २० ‘क्रेडीट्स’ मिळविण्यानंतर

डिग्री विथ मेजर:त्याच अभ्यासक्रमात ‘ऑनलाइन’ माध्यमातून १८ ते २० अतिरिक्त ‘क्रेडिट्स’ मिळविल्यानंतर

डिग्री विथ ऑनर्स : अभ़्यासक्रमातील प्रत्येक सत्रात उत्तीर्ण सात किंवा त्याहून अधिक ‘सीजीपीए’ मिळविल्यानंतर

विशेषाधिकारात घेतला निर्णय

११ डिसेंबर २०२० व १४ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या अभियांत्रिकी अभ्यास मंडळाच्या बैठकीत ‘एआयसीटीई’च्या निर्देशांनुसार ‘बीई’ व ‘बीटेक’साठी १६० ‘क्रेडिट्स’चा समान अभ्यासक्रम बनविण्याबाबत चर्चा झाली. नवीन शैक्षणिक कार्यक्रम तयार करत असताना त्यासाठी अध्यादेश जारी करावा लागतो. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने व नवीन सत्राच्या अगोदर बदलांना मंजुरी देणे आवश्यक असल्याने कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी विद्यापीठ कायद्याच्या कलम १२ (८) अंतर्गत संबंधित निर्णय घेतला.