शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीची आदित्य ठाकरे यांनी केली प्रशंसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 19:59 IST

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राखण्यासाठी आणि मृत्यूदर कमीत-कमी ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची प्रशंसा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राखण्यासाठी आणि मृत्यूदर कमीत-कमी ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची प्रशंसा केली.आदित्य ठाकरे यांनी नागपूर, नाशिक आणि औरंगाबादच्या मनपा आयुक्तांसोबत कोरोनावर प्रभावी ­नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. ठाकरे म्हणाले, तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका आणि नाविन्यपूर्ण उपाय करून कोरोनाचे प्रभावी नियंत्रण केले. त्यांनी कॉटॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग आणि शीघ्र उपचाराची व्यवस्था केली. आता राज्याच्या इतर ठिकाणी सुध्दा कॉटॅक्ट ट्रेसिंगवर जोर दिल्या जात आहे. महापालिकानी घरोघरी सर्वेक्षण, समूह विलगीकरण रणनीतीवर जास्त भर दिला पाहिजे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.मुंढे यांनी नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कोरोनाशी लढण्यासाठी शासनाच्या दिशानिर्देशानुसार महापालिकेने कोरोना वार रुम’मध्ये तज्ज्ञांशी दररोज चर्चा करुन नवनवीन उपाययोजनांचा शोध घेतला. वेळ वाया न घालवता या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन कोविड-१९ चा प्रसार प्रभावीपणे रोखला. महापालिकेंतर्गत असलेल्या रुग्णालयांमधील खाटांची संख्या ५०० पर्यंत नेली आणि खासगी रुग्णालयांनासुद्धा कोविड-१९ च्या रुग्णांसाठी तयारी ठेवण्याचे निर्देश दिले.

केंद्र शासनाच्या पथकानेसुध्दा नागपूर महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. मनपाच्या माध्यमाने घरोघरी सर्वेक्षण, गरोदर स्त्रिया, टी.बी. रुग्ण, कुष्ठरोगी, कर्करोगी रुग्णांची विशेष तपासणी आणि विशेष काळजी घेण्यात आली. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरु केली. कोरोना कंट्रोल रुमच्या माध्यमाने रुग्णांची माहिती मिळवण्यात मदत झाली. लॉकडाऊन काळात १२००० नागरिकांचे मानसिक समुपदेशन करण्यात आल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली. मुंढे यांनी राज्य शासनाला अद्ययावत रुग्णवाहिका (लाईफ सर्पोट अ‍ॅम्ब्युलन्स) देण्याची विनंती केली. ठाकरे यांनी या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेtukaram mundheतुकाराम मुंढे