शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आरटीपीसीआर टेस्टविना प्रवाशांना स्टेशनबाहेर नेणाऱ्या ऑटोचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:06 IST

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर बाहेरील राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे; परंतु ही टेस्ट टाळायला लावणारे ...

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर बाहेरील राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे; परंतु ही टेस्ट टाळायला लावणारे ऑटोचालक प्रवाशांना आरएमएस इमारतीतून बाहेर घेऊन जात होते. या ऑटोचालकांवर आरपीएफने कारवाई केली आहे.

नागपूर रेल्वेस्थानकावर बाहेरील राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. त्यासाठी प्लॅटफार्म क्रमांक १ वरील पॅसेंजर लाऊंजमध्ये तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेची चमू तेथे तैनात आहे; परंतु काही ऑटोचालक प्रवासी मिळविण्यासाठी आरएमएस (रेल्वे मॅसेज सर्व्हिस) इमारतीतून आत शिरत होते. प्लॅटफार्मवर प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी वेळ वाया घालवू नका; तुम्हाला मी थेट बाहेर नेतो असे ते सांगत. त्यानंतर ते आरएमएस इमारतीतून या प्रवाशांना थेट रेल्वेस्थानकाच्या बाहेर घेऊन जात होते. हा प्रकार १९, २० आणि २१ तारखांना खुलेआम सुरू होता. रेल्वे सुरक्षा दलाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर २१ तारखेला आरपीएफने यांतील पाच ऑटोचालकांना अटक केली. रमजान फतेह खान, इमरान सलीम खान, मोहम्मद इजाज इलियास, मोहम्मद शहनवाज अखिल आणि मार्टीन रॉर्टसन अशी ऑटोचालकांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...............