८ प्रतिष्ठानांवर कारवाई, ६० हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST2021-03-15T04:08:19+5:302021-03-15T04:08:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रविवारी ८ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६० हजारांचा दंड वसूल ...

Action against 8 establishments, fine of Rs. 60,000 recovered | ८ प्रतिष्ठानांवर कारवाई, ६० हजारांचा दंड वसूल

८ प्रतिष्ठानांवर कारवाई, ६० हजारांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रविवारी ८ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६० हजारांचा दंड वसूल केला. दरम्यान, उपद्रव पथकाने शहरातील ७२ प्रतिष्ठान व मंगल कार्यालयांची तपासणी केली. शारीरिक अंतर न पाळणाऱ्यांकडून दंड वसूल केला.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांनी ही कारवाई केली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत पाच मंगल कार्यालयांची तपासणी करून पाच हजार दंड वसूल केला. धरमपेठ झोनअंतर्गत सहा कार्यालयांची तपासणी करून १० हजार दंड वसूल केला. हनुमाननगर झोन येथील चार प्रतिष्ठानांची तपासणी केली. धंतोली झोनअंतर्गत पाच मंगल कार्यालये व लॉनची तपासणी करून १० हजार दंड वसूल केला. नेहरूनगर झोनमधील ६ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. गांधीबाग झोनमधील ५ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार दंड वसूल केला.

सतरंजीपुरा झोनमधील सहा प्रतिष्ठानांची, लकडगंज झोनअंतर्गत नऊ प्रतिष्ठानांची, आशीनगर झोनमध्ये १६ प्रतिष्ठानांची तपासणी केली. मंगळवारी झोनमधील १४ प्रतिष्ठानांची तपासणी करून २०हजार दंड वसूल केला.

Web Title: Action against 8 establishments, fine of Rs. 60,000 recovered