शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  २३ वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 00:30 IST

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते १५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये दहाही झोनमधील २३ वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करून २ लाख १९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबायोमेडिकल कचरा सर्वसाधारण कचऱ्यात टाकला : २ लाख १९ हजार रुपये दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णालयात निर्माण होणारा बायोमेडिकल कचरा सर्वसाधारण कचऱ्यामध्ये टाकल्या जातो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते १५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये दहाही झोनमधील २३ वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करून २ लाख १९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.गेल्या मंगळवारी सीताबर्डी येथील एका वैद्यकीय व्यावसायिकाने बायोमेडिकल कचरा सर्वसाधारण कचऱ्यात टाकल्याने त्यांच्याकडून धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाने २५ हजार रुपये दंड वसूल केला. स्वच्छता निरीक्षक जयंत जाधव, उपद्रव शोध पथकाचे धरमपेठ झोन टीम लीडर आशिष कटरे यांच्यासह झोनच्या पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे स्क्वॉड लीडर वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपले नागपूर स्वच्छ, सुंदर राहावे तसेच येथील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी यासाठी मनपातर्फे कारवाई केली जात आहे. मात्र अनेकदा नियमांचे उल्लंघन करून स्वच्छ नागपूरच्या संकल्पनेला अडसर निर्माण केला जात आहे. यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे झोनस्तरावर उपद्रव शोध पथक तैनात करण्यात आले आहे. शहर स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण करून अस्वच्छता पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम उपद्रव शोध पथकाद्वारे सुरू आहे.लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक सात जणांवर कारवाईबायोमेडिकल कचऱ्याबाबत उपद्रव शोध पथकाद्वारे दहाही झोनमध्ये एकूण २३ प्रकरणात कारवाई करण्यात आली. यात लक्ष्मीनगर झोनमध्ये ७ व्यावसायिकांवर, धंतोली झोनमध्ये ६, मंगळवारी झोनमध्ये ५, तर धरमपेठ, हनुमाननगर, नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज झोनमध्ये प्रत्येकी एका वैद्यकीय व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गांधीबाग व आसीनगर झोनमध्ये अद्यापपर्यंत एकही कारवाई झालेली नाही.

टॅग्स :doctorडॉक्टरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका