१५ प्रतिष्ठानांवर कारवाई; १.३० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:07 IST2021-05-24T04:07:47+5:302021-05-24T04:07:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रविवारी १५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ३० हजारांचा दंड ...

Action on 15 establishments; 1.30 lakh fine | १५ प्रतिष्ठानांवर कारवाई; १.३० लाखांचा दंड

१५ प्रतिष्ठानांवर कारवाई; १.३० लाखांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रविवारी १५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ३० हजारांचा दंड वसूल केला. पथकाने ५० प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.

लक्ष्मीनगर झोनअंतर्गत तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजारांचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ३५ हजार, हनुमाननगर पथकाने दोन दुकानांची तपासणी करून २५ हजार, धंतोलीच्या पथकाने १० दुकानांची तपासणी करून ५ हजारांचा दंड वसूल केला. नेहरूनगर येथे दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार रुपये, गांधीबाग येथे तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार रुपये, सतरंजीपुरा येथे आठ प्रतिष्ठानांची तपासणी करून १८ हजार रुपये दंड वसूल केला. लकडगंज पथकाने चार दुकानांची तपासणी करून १० हजार रुपये, आसीनगर पथकाने १० प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजाराचा, तर मंगळवारी झोन पथकाने तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

मनपा आयुक्त राधाकृष्णन्‌ बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोधपथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.

Web Title: Action on 15 establishments; 1.30 lakh fine