शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

त्या आरोपी मायलेकीस तीन लाख रुपये भरपाई

By admin | Updated: May 18, 2015 02:41 IST

पोलीस व सत्र न्यायालयाच्या कल्पनाविलासी भूमिकेमुळे शिक्षा भोगावी लागलेल्या मायलेकीस हायकोर्टाच्या आदेशान्वये तीन लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

नागपूर : पोलीस व सत्र न्यायालयाच्या कल्पनाविलासी भूमिकेमुळे शिक्षा भोगावी लागलेल्या मायलेकीस हायकोर्टाच्या आदेशान्वये तीन लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही रक्कम दोघींमध्ये सारखी विभागली जाणार आहे. सावित्रीबाई (४५) व रमा नारायण जोगदंड (१९) अशी आरोपींची नावे असून त्या दगड धानोरा, ता. उमरखेड येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर नवजात मुलाची हत्या केल्याचा आरोप होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ११ सप्टेंबर २००३ रोजी रमाने उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात मुलाला जन्म दिला होता. यानंतर ती कुणालाही न सांगता मुलाला घेऊन निघून गेली. काही दिवसांनी जवळच्या नदीत एका नवजात मुलाचे शव आढळून आले. प्राथमिक तपासानंतर पोफळी पोलिसांनी सावित्रीबाई व रमाला अटक केली होती. २००६ मध्ये सत्र न्यायालयाने दोघींनाही भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप ठोठावली होती. रमाने तिच्या शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील केले होते. उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला होता. सावित्रीबाईने अपील करण्यासाठी अमरावती येथील वऱ्हाड संस्थेला पत्र लिहिले होते. परंतु, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. नागपूर कारागृहात स्थानांतरित झाल्यानंतर तिच्यावतीने अपील दाखल करण्यात आले. तत्पूर्वी ती १२ वर्षांपासून कारागृहात होती.अपीलांवर सुनावणी करताना दोन्ही आरोपींवर अन्याय झाल्याचे व त्यांना कोणतेही पुरावे नसताना शिक्षा सुनावण्यात आल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली. यामुळे उच्च न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्याचे निर्देश शासनास दिले होते. शासनाने त्याला मान्यता दिली आहे. दोघींंच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्यात ही रक्कम जमा करण्याची जबाबदारी नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षकाकडे सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)