शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कळमन्यातील कुख्यात गुंडाच्या खुनातून आरोपी निर्दोष

By admin | Updated: July 29, 2015 03:04 IST

कळमना गुलशननगर भागातील कुख्यात गुंड युवराज ऊर्फ बाल्या जयराम रहांगडाले याच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र ...

नागपूर : कळमना गुलशननगर भागातील कुख्यात गुंड युवराज ऊर्फ बाल्या जयराम रहांगडाले याच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने एका आरोपीची निर्दोष सुटका केली. सरकार पक्ष आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याचे, न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले आहे. योगेंद्र ऊर्फ गोलू मंगल पाल (३१) रा. गुलशननगर शितला माता मंदिरजवळ, असे आरोपीचे नाव आहे. तो मजुरीचे काम करायचा. मृत बाल्या रहांगडाले हा खतरनाक गुन्हेगार होता. त्याच्या नावाची मोठी दहशत होती. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, २१ जून २०१४ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास गोलू पाल हा मोबाईल रिचार्जसाठी शितला माता मंदिर चौकात गेला होता. तेथे बाल्या रहांगडाले याने गोलूला गाठले होते. मोहल्ल्यात मंडईचे आयोजन करण्यावरून बाल्याने गोलूसोबत भांडण उकरून काढले होते. दोघांमध्ये बाचाबाची होऊन त्यांनी एकमेकांना थापडा मारल्या होत्या. गोलू पालने तडक घरी जाऊन मिरची पावडर आणि चाकू आणला होता. त्याने बाल्या रहांगडाले याच्या डोळ्यात मिरची पावडर झोकून चाकूने सपासप अनेक वार केले होते. बाल्यानेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गोलू हा बाल्याने केलेला चाकूचा वार हुकवीत होता. चेहऱ्यावर, गळ्यावर अनेक वार करून गोलूने त्याचा जागीच खून केला होता. लागलीच गोलू हा रक्ताने माखलेल्या शस्त्रासह कळमना पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्याने घडलेली घटना पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र राऊत याला सांगितली होती. त्यावरून गुन्ह्याचा प्रथम खबरी अहवाल तयार करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी सहा साक्षीदारांनी सरकार पक्षाला कोणतीही मदत केली नाही. सरकारी वकिलाने त्यांची उलट तपासणी घेतली परंतु आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करणारे कोणतेही ठोस पुरावे प्राप्त करू शकले नाहीत. परिणामी न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सी. आर. ठाकूर तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील सुनीता खोब्रागडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)