शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
3
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
4
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
5
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
6
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
7
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
8
आईसारखा की बाबांसारखा? विकीच्या वाढदिवशी कतरिनाने शेअर केला छोट्या विहानचा फोटो
9
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
10
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
11
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
12
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
13
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
14
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
15
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
16
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
17
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
18
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
19
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
20
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

अपघातांचा वार!

By admin | Updated: May 26, 2014 01:06 IST

भरधाव महिंद्रा पिकअपने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. हा भीषण अपघात कोराडी पोलीस

कोराडी रोडवर पाच ठार: महिंद्रा पिकअपची ट्रकला धडक

नागपूर : भरधाव महिंद्रा पिकअपने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. हा भीषण अपघात कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन औष्णिक प्रकल्पाजवळ रविवारी रात्री ९.५0 वाजताच्या सुमारास झाला.

अपघात एवढा भीषण होता की, मृतांचा चेहरा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे त्यांची ओळख वृत्त लिहिस्तो पटली नव्हती. जखमींमध्ये शिवभिला सिंग (४0), विलाप्रताप सिंग (३५) व ज्ञानेश्‍वर बागडे (३५, रा. तेलकामठी, ता. सावनेर) यांचा समावेश आहे.

प्राथमिक तपासणीत असे आढळून आले की, महिंद्रा पिकअपचा चालक हा दारू प्यायला असल्याने सदर अपघात झाला. हे सर्व जण एमएच-३१/डीसी-४१५३ क्रमांकाच्या महिंद्रा पिकअपने सावनेरहून नागपूरकडे येत होते.

दरम्यान, कोराडी येथील नवीन वीज प्रकल्पाजवळ या महिंद्रा पिकअपने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच-४0/वाय-२६१५ क्रमांकाच्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात अनेकांच्या डोक्याला जबर मार बसला. मृतांसह जखमींना लगेच मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. सदर ट्रक हा रेतीची वाहतूक करणारा असून, तो पंक्चर झाल्याने नागपूरच्या दिशेने रोडच्या कडेला उभा होता. या ट्रकच्या मागच्या भागाला रेडियमचे स्टीकर नसल्याने तसेच रोडवर प्रकाशाची व्यवस्था नसल्याने भरधाव महिंद्रा पिकअप या ट्रकवर आदळली. या अपघातातील जखमी व मृतांमध्ये हे उत्तर प्रदेशातील असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)