शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलींना हरविण्यासाठी विकासाचा मार्ग स्वीकारा

By admin | Updated: September 5, 2016 02:34 IST

नक्षली जल, जमीन व जंगलावर अधिकार सांगून दिशाभूल करतात. त्यांच्या कोणत्याही भावनिक आवाहनाला बळी पडू नका.

शिवाजीराव बोडखे यांचे आवाहन : सहलीवरून परतलेल्या आदिवासी मुलामुलींचा सत्कारनागपूर : नक्षली जल, जमीन व जंगलावर अधिकार सांगून दिशाभूल करतात. त्यांच्या कोणत्याही भावनिक आवाहनाला बळी पडू नका. आदिवासी नागरिकांनी नक्षलींविरुद्ध शस्त्र घेऊन लढावे अशी कोणाचीच अपेक्षा नाही. त्यांनी केवळ विकासाचा मार्ग स्वीकारला तरी, नक्षली पराभूत होतील असे मत नक्षलविरोधी अभियानाचे विशेष महानिरीक्षक शिवाजीराव बोडखे यांनी व्यक्त केले.गडचिरोली पोलीस व गडचिरोली जिल्हा आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी मुलामुलींसाठी आपला महाराष्ट्र सहल आयोजित करण्यात आली होती. या मुलामुलींचा व ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा रविवारी बजाजनगरातील विष्णूजी की रसोई येथे मैत्री परिवार संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, संस्थेचे सचिव प्रमोद पेंडके, डॉ. नरेंद्र भुसारी व संजय नखाते व्यासपीठावर उपस्थित होते. सहलीमध्ये ४३ मुले व ३८ मुली सहभागी झाल्या होत्या. मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्यानंतर हे मुलेमुली रविवारी नागपुरात आले होते. देश झपाट्याने बदलत असताना आदिवासी समाज मात्र आजही विकासापासून दूर आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर अधिकार सांगून व जीवनभर जंगलात राहून काहीच साध्य होणार नाही. या विचारामुळे पुढील अनेक पिढ्या मागासलेल्याच राहतील. यामुळे जंगलातून बाहेर पडा. महाराष्ट्र सहल हा उपक्रम आदिवासी मुलामुलींना विकासाचे दर्शन घडविण्यासाठी आहे. हा धागा पकडून पुढे जा. स्वत:सह इतरांनाही जागृत करा. सर्वांना उच्च पदाची नोकरी मिळविता येणार नाही, पण चांगला नागरिक निश्चितच होता येईल असेही बोडखे यांनी सांगितले. आदिवासी मुलामुलींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र सहलीच्या निमित्ताने चांगली परंपरा सुरू झाली आहे. सतत नवीन शिकण्याची जिद्द ठेवणारी व्यक्तीच पुढे जाते. स्वत:ला पूर्ण समजणाऱ्याचा विकास थांबतो. जगात साध्या लोकांनीच क्रांती केली आहे असे मत पोरेड्डीवार यांनी व्यक्त केले.भुसारी यांनी करिअरवर मार्गदर्शन केले. शिल्पा बेलादे व रोहित कोळसा यांनी सहलीचे अनुभव सांगितले. सुरुवातीला सुरसंगमच्या कलावंतांनी देशभक्तिपर व प्रेरणादायी गीते सादर केलीत. नखाते यांनी प्रास्ताविक तर, भुवनेश्वरी परशुरामकर यांनी संचालन केले. मनोज बंड यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)