शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सिकलसेल मुक्तीसाठी आमीर खानला साकडे

By admin | Updated: October 31, 2014 00:49 IST

‘सिकलसेल सोसायटी आॅफ इंडिया’ सिकलसेल मुक्त भारत बनविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून या सोसायटीचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी ‘सत्यमेव जयते’

सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचा प्रयत्न : जनजागृतीसाठी निवेदननागपूर : ‘सिकलसेल सोसायटी आॅफ इंडिया’ सिकलसेल मुक्त भारत बनविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून या सोसायटीचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमामधून या आजाराची जनजागृती करण्यात यावी, यासाठी अभिनेते आमीर खान यांना साकडे घातले आहे. सिकलसेल हा आजार १९१०मध्ये निदर्शनास आला. अमेरिका, आफ्रिका, युरोप व आशिया या खंडांमध्ये आजाराचा प्रभाव पाहायला मिळाला. मागील १०४ वर्षे होऊनही हा आजार नष्ट होण्यावर औषध उपलब्ध नाही. ‘सिकलसेल’ हा आजार केवळ बाळाच्या जन्मानंतर या एकच माध्यमातून वाढतो. त्यामुळे जनजागृतीच्या माध्यमातूनच सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळविता येणे शक्य आहे. संयुक्त राष्ट्र संघ व जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला सामाजिक आरोग्य समस्या म्हणून घोषित केले असून, जगातील घातक आजारांच्या श्रेणीत या आजाराचा समावेश केला आहे. १९५२ पासून आजपर्यंत १२ राज्यांमध्ये आढळून आलेल्या या आजाराने १० लाखांपेक्षा जास्त कुटुंबाला अडचणीत आणले आहे. आजार व सर्वेक्षणावर केंद्र शासनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले. परंतु, नियंत्रणासाठी ६७ वर्षांनंतरही केंद्र व राज्य शासनाकडून योग्य पावले उचलण्यात आली नाही. आमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक समस्या व नागरिकांच्या हितासाठी जनजागृती केली जाते. सिकलसेल आजाराबाबतही जनजागृती व्हावी यासाठी सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी अभिनेते आमीर खान यांची मुंबईत भेट घेऊन सिकलसेल आजाराविषयीची माहिती दिली. यावर खान यांनी, ‘सिकलसेल माझ्यासाठी नवीन आरोग्य समस्या असून, इतर मार्गांनी माहिती घेईल’ असे आश्वासन दिले.(प्रतिनिधी)