शहरातील ८.७६ टक्के लोकांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:22+5:302021-04-07T04:08:22+5:30

लाकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत शहरात २६२८३० लाभार्थींनी पहिला, ...

8.76 per cent people in the city were vaccinated | शहरातील ८.७६ टक्के लोकांनी घेतली लस

शहरातील ८.७६ टक्के लोकांनी घेतली लस

लाकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत शहरात २६२८३० लाभार्थींनी पहिला, तर २३०७२ लाभार्थींनी दुसरा डोस घेतला. शहरातील ८.७६ टक्के लोकांनी कोरोना लस घेतली आहे.

नागपूर शहरात १६ जानेवारीपासून आरोग्य सेवक, २ फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्करला कोरोना लस दिली जात आहे. १ मार्चपासून ६० वर्षे वयावरील तर ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्यांना लस दिली जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व लोकांना लस देण्याचे आदेश जारी करण्यात आले. सध्या दररोज १० ते १२ हजार लोकांना लस दिली जात आहे.

लसीकरणाला अधिक गती देण्यासाठी ८५ लसीकरण केंद्राशिवाय पुन्हा ५१ नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.

विशेष म्हणजे शनिवारी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत आरोग्य सेवक व फ्रंट लाइन वर्करची लसीकरण नोंदणी तात्काळ बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रावर गोंधळाचे वातावरण होते; परंतु आधीच नोंदणी केलेल्यांना लस दिली जात आहे.

...

ज्येष्ठ नागरिक लस घेण्यात आघाडीवर

६० वर्षांहून अधिक वयाच्या १ लाख १९ हजार ८५४ लाभार्थींनी लस घेतली आहे. नागपूर शहरात ६० वर्षांवरील नागरिकांची संख्या ९ लाखांच्या आसपास आहे.

...

नागपूर शहरातील लसीकरण (५ एप्रिलपर्यंत)

पहिला डोस

आरोग्य सेवक - ४०२२८

फ्रंटलाइन वर्कर - ३२८१२

४५ वर्षांवरील - २१२०५

४५ वर्षांवरील आजारी - ४८७२०

६० वर्षांवरील - ११९८५४

एकूण - २६२८३०

...

दुसरा डोस

आरोग्य सेवक - १४५८८

फ्रंटलाइन वर्कर - ६९९२

४५ वर्षांवरील - १८

४५ वर्षांवरील आजारी - १५७

६० वर्षांवरील - १३१७

एकूण - २३०७२

Web Title: 8.76 per cent people in the city were vaccinated