लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी ७ नवे भविष्याभिमुख पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. बारावी विज्ञान शाखा किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी विद्यापीठाच्या या नियमित आणि मागणी असलेल्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात.
या नव्या अभ्यासक्रमांमध्ये बी.एससी. सायबर सायन्स, बी.एससी. ड्रोन सायन्स, बी.एससी. सेमीकंडक्टर मटेरियल्स अँड डिव्हाइसेस, बी.एससी. डाटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बी.एससी. फायनान्शियल ॲक्चुरियल मॅथेमॅटिक्स, बी.एससी. सिस्टिम्स ॲप्लिकेशन्स अँड प्रॉडक्ट इन डाटा प्रोसेसिंग आणि बी.एससी. इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे. बदलत्या जागतिक तंत्रज्ञान आणि उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन हे अभ्यासक्रम पूर्णपणे प्रॅक्टिकल आणि कौशल्याधारित पद्धतीने तयार करण्यात आले आहेत.
हे अभ्यासक्रम विशेष का?
सायबर सायन्स आणि ड्रोन सायन्स
सायबर सायन्समध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, एथिकल हॅकिंग आणि नेटवर्क सिक्युरिटीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर ड्रोन सायन्समध्ये ड्रोन तंत्रज्ञान आणि यूएव्ही प्रणालींचे शिक्षण दिले जाईल. संरक्षण, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात या कौशल्यांना मोठी मागणी आहे.
सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स
भारत सेमीकंडक्टर मिशनच्या पार्श्वभूमीवर नॅनो-तंत्रज्ञान आणि डिव्हाइस इंजिनिअरिंगवर विशेष भर देण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांतर्गत एम्बेडेड सिस्टिम्स आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे शिक्षण दिले जाईल.
डाटा सायन्स, एआय आणि इतर अभ्यासक्रमविद्यार्थ्यांना मशीन लर्निंग, बिग डाटा ॲनालिटिक्स, रिस्क ॲनालिसिस आणि औद्योगिक डाटा प्रोसेसिंगचे प्रगत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
रोजगाराच्या उत्तम संधी
हे सर्व अभ्यासक्रम उद्योगाभिमुख असून थिअरीपेक्षा प्रयोगशाळा, प्रात्यक्षिक शिक्षण, अनिवार्य इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट-बेस्ड प्रशिक्षणावर अधिक भर देण्यात आला आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना आघाडीच्या कंपन्या, संशोधन संस्था, स्टार्टअप्स आणि सरकारी क्षेत्रात थेट करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
प्रवेश पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा पास विद्यार्थी तसेच पॉलिटेक्निक डिप्लोमा धारक विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतील.
इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी. प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शनासंदर्भातील अधिक माहितीसाठी विद्यार्थी विद्यापीठाच्या ‘ॲडमिशन काऊन्सेलिंग सेल’शी संपर्क साधू शकतात किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
Web Summary : Nagpur University launches seven future-oriented degree programs under the National Education Policy 2020. Courses include Cyber Science, Drone Science, and Data Science. 12th science pass or diploma holders are eligible. These practical, skill-based courses offer excellent career opportunities in growing sectors.
Web Summary : नागपुर विश्वविद्यालय ने राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के तहत सात भविष्योन्मुखी डिग्री कार्यक्रम शुरू किए। पाठ्यक्रमों में साइबर साइंस, ड्रोन साइंस और डेटा साइंस शामिल हैं। 12वीं विज्ञान उत्तीर्ण या डिप्लोमा धारक पात्र हैं। ये व्यावहारिक, कौशल-आधारित पाठ्यक्रम बढ़ते क्षेत्रों में उत्कृष्ट कैरियर के अवसर प्रदान करते हैं।