शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ६६ टक्के विद्यापीठ ‘नॅक’च्या श्रेणीबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 11:50 IST

Nagpur News खासगी विद्यापीठ वगळता राज्यातील ६६ टक्के विद्यापीठ गुणवत्तेचे मूल्यमापन करणाऱ्या ‘नॅक’च्या (नॅशनल असेसमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन कैन्सिल) श्रेणीबाहेर आहेत.

ठळक मुद्देकेवळ एकच विद्यापीठ ‘ए प्लस प्लस’मध्येअनेक विद्यापीठांकडून अद्यापही मूल्यांकनासाठी प्रस्ताव नाही

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्रात विविध प्रकारची ६० अकृषी विद्यापीठे असून देशातील एक मोठे शैक्षणिक केंद्र म्हणून राज्याची ओळख आहे. मात्र काही मोजक्या विद्यापीठांनीच आपला दर्जा कायम राखला आहे. खासगी विद्यापीठ वगळता राज्यातील ६६ टक्के विद्यापीठ गुणवत्तेचे मूल्यमापन करणाऱ्या ‘नॅक’च्या (नॅशनल असेसमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन कैन्सिल) श्रेणीबाहेर आहेत. बऱ्याच विद्यापीठांच्या मूल्यांकनाची मुदत संपली असल्याचे चित्र आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ए प्लस प्लस मूल्यांकन मिळविणारे केवळ एकच विद्यापीठ राज्यात आहे.

देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे ‘नॅक’कडून मूल्यांकन केले जाते. मूल्यांकन करताना अभ्यासक्रमाचा व अध्ययनाचा दर्जा, शिक्षक व कर्मचाऱ्यांची संख्या, संशोधन, पायाभूत सुविधा, व्यवस्थापन, नेतृत्व, विद्यार्थ्यांचा सहभाग, विद्यापीठातील विधायक उपक्रम, पेटंट इत्यादी बाबींचा विचार करण्यात येतो व त्यानंतर मूल्यांकनाची श्रेणी बहाल केली जाते. महाराष्ट्रात विविध प्रकारची ६० विद्यापीठे आहेत. त्यात एका केंद्रीय विद्यापीठासोबतच १९ राज्य अकृषी विद्यापीठ, २१ डीम्ड विद्यापीठ व १९ खासगी विद्यापीठांचा समावेश आहे. यातील खासगी विद्यापीठ वगळली तर केंद्रीय, राज्य व डीम्ड विद्यापीठांची संख्या ४१ इतकी आहे. ‘नॅक’च्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत त्यापैकी केवळ १४ विद्यापीठांनाच ‘नॅक’चे मानांकन असून, ही टक्केवारी केवळ ३४.१४ टक्के इतकीच आहे. अनेक विद्यापीठांच्या मूल्यांकनाची मुदत संपून वर्ष उलटले आहे. मात्र परत मूल्यांकनासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात चालढकल सुरू आहे. तर काही विद्यापीठांनी प्रस्ताव पाठविला असला तरी ‘कोरोना’मुळे ‘नॅक’च्या समितीने विद्यापीठांना भेट दिलेली नाही.

दहा विद्यापीठांना ‘ए प्लस’ व ‘ए’ श्रेणी

१४ विद्यापीठांना ‘नॅक’ मूल्यांकनाची श्रेणी आहे. त्यापैकी केवळ ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’लाच (डीम्ड विद्यापीठ) ‘नॅक’ मूल्यांकनाची ‘ए प्लस प्लस’ ही श्रेणी आहे. पाच विद्यापीठ ‘ए प्लस’ श्रेणीत आहेत. त्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वगळता इतर चारही ‘डीम्ड’ विद्यापीठ आहेत, तर पाच विद्यापीठांना ‘ए’ श्रेणी आहे.

‘कोरोना’चा फटका

जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत राज्यातील १३ विद्यापीठांच्या मूल्यांकनाची मुदत संपली. त्यातील काही विद्यापीठांनी ‘एसएसआर’सह प्रस्ताव सादर केला. मात्र ‘कोरोना’मुळे प्रत्यक्ष ‘नॅक’च्या समितीचा दौरा होऊ शकलेला नाही. यामुळे संबंधित विद्यापीठांना फटका बसला आहे.

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र