शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१५० व्यापाऱ्यांवर पडणार ६२५ कोटी रुपयांचा बोझा

By admin | Updated: July 29, 2015 02:52 IST

राज्य सरकारने अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे जर ५० कोटीपेक्षा अधिक उलाढालीचा निकष आणला तर नागपुरातील १५० बड्या व्यापाऱ्यांवर एलबीटीचा ६२५ कोटीचा बोझा पडू शकतो.

महसुलाची भरपाई करण्यासाठी महापौरांनी केली दरमहा ६५ कोटींची मागणीसोपान पांढरीपांडे नागपूरराज्य सरकारने अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे जर ५० कोटीपेक्षा अधिक उलाढालीचा निकष आणला तर नागपुरातील १५० बड्या व्यापाऱ्यांवर एलबीटीचा ६२५ कोटीचा बोझा पडू शकतो.वाचकांना आठवतच असेल की, गेल्या महिन्यात महापौर प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एलबीटी रद्द केल्यास नागपूर महानगरपालिकेला महसुलाची भरपाई करण्यासाठी दरमहा ६५ कोटी रुपये मिळावे अशी मागणी केली आहे. याचा खुलासा करताना नागपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम म्हणाले २०१३ साली एलबीटी लागू झाला तेव्हा मनपाचे आॅक्ट्रॉयचे उत्पन्न ४८० कोटी रुपये होते. वार्षिक - १७ टक्क्यांची वाढ गृहीत धरून हे उत्पन्न आज ७९० कोटींच्या घरात असते. पण दुर्दैवाने एलबीटीचे उत्पन्न केवळ ३३० कोटी रुपये आहे आणि त्यामुळे मनपा आर्थिक संकटात आहे. त्यामुळेच महापौरांनी दरमहा ६५ कोटी म्हणजे वार्षिक ७८० कोटी रुपयांची मागणी केली आहे. नागपूर शहरात एलबीटीसाठी नोंदणीकृत ४०,००० व्यापारी आहेत व त्यापैकी २१,००० व्यापाऱ्यांनी उलाढालीबद्दल माहिती दिली आहे. यापैकी केवळ ८० व्यापारी ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल करतात. त्यामुळे उरलेल्या १९,००० व्यापाऱ्यांमध्ये ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेले ७० व्यापारी गृहित धरले तर नागपुरात ५० कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेले फारतर १५० व्यापारी असतील.राज्य सरकारच्या निकषाप्रमाणे जर ५० कोटीपेक्षा अधिक उलाढाल असणारे व्यापारी ८० टक्के कर भरणा करणारे असतील तर नागपुरात या व्यापाऱ्यांवर एलबीटीचा बोझा रु. ६२५ कोटी (रु. ७८० कोटींच्या ८० टक्के) पडण्याची शक्यता आहे.शहरातील हे १५० बडे व्यापारी एलबीटीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एकतर आपला व्यापार शहराबाहेर नेतील किंवा आपली उलाढाल अनेक फर्म स्थापन करून विभाजित करतील. व्यापाऱ्यांनी यापैकी कुठलाही मार्ग अवलंबिला तरी मनपाला एलबीटीचा महसूल मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे राज्य सरकारने जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी सुरू ठेवणे क्रमप्राप्त आहे हेही तेवढेच स्पष्ट आहे.(उद्या वाचा - पेट्रोल पंपाचा फायदा करणार मनपाचे नुकसान)