शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

५८२५ शेतकरी सावकारी कर्जातून मुक्त

By admin | Updated: December 30, 2015 03:24 IST

सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत आठ जिल्हास्तरीय बैठका घेण्यात आल्या असून आतापर्यंत ५८२५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.

नागपूर : सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत आठ जिल्हास्तरीय बैठका घेण्यात आल्या असून आतापर्यंत ५८२५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या ९.९४ कोटी रुपयांची कर्ज मंजुरी घेतली आहे.याचा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आढावा घेतला. त्याअनुषंगाने कर्ज माफीची रक्कम ही संबंधित परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेली तारण वस्तू परत करावी. त्यांच्या पोचपावतीसह माफीची रक्कम प्राप्त करुन घेण्याकरिता प्रस्ताव तालुका सहायक निबंधकाकडे विनाविलंब सादर करावेत, असे निर्देश सुद्धा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले.परवानाधारक सावकार काही कर्जदारांचीच गहाण वस्तू परत करतात आणि काही लोकांचे गहाण बरेच दिवसापासून परत केलेले नाही. त्यामुळे माफीची रक्कम वितरित करण्यात अडचणी येत आहे. ज्या शेतकरी कर्जदाराला सावकारी कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्यांनी देखील स्वत:ची रुजवात तालुका सहायक निबंधकाकडे करून त्यांच्या गहाणवस्तू सावकराकडून स्वत:च्या ताब्यात घेऊन सदर योजनेचा लाभ घ्यावा. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना निरोप देऊनसुद्धा ते वेळीच गहाणवस्तू परत नेत नाहीत. त्यामुळे देखील सावकारांच्या खात्यात माफीची रक्कम जमा करण्यात विलंब होत आहे.सर्व तालुका सहायक निबंधकांनी ज्या शेतकरी कर्जदाराला सावकारी कर्जमाफीची रक्कम मंजूर झाली आहे त्या सर्व शेतकरी कर्जदाराला लेखी पत्र द्यावे आणि गहाण वस्तू परत केल्याची पोच पावती व रुजवातीसह प्रस्ताव तालुका सहायक निबंधकांनी विनाविलंब जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूरकडे सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)