५१ तरुणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:07 IST2021-07-02T04:07:15+5:302021-07-02T04:07:15+5:30

रामटेक : ‘डाॅक्टर डे’च्या निमित्ताने गुरुवारी (दि. १) रामटेक येथील आनंदधाम येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, वाईल्ड चॅलेंजर ...

51 youths donated blood | ५१ तरुणांनी केले रक्तदान

५१ तरुणांनी केले रक्तदान

रामटेक : ‘डाॅक्टर डे’च्या निमित्ताने गुरुवारी (दि. १) रामटेक येथील आनंदधाम येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन, बेटी बचाव बेटी पढाव व सर्पमित्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ५१ तरुणांनी रक्तदान केले.

याप्रसंगी रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक प्रकाश उजगिरे, डॉ. प्रदीप बोरकर, डॉ. आदर्श गायकवाड यांच्यासह अन्य डाॅक्टरांचा गाैरव करण्यात आला. यावेळी तहसीलदार बाळासाहेब मस्के, खंडविकास अधिकारी प्रदीप बमनोटे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, आनंदधामचे संचालक लक्ष्मण मेहर, विजय हटवार, पत्रकार संघाचे वसंत डामरे, अनिल वाघमारे, राजू कापसे, विशाल भोसले, राहुल पिपरोदे उपस्थित हाेते. नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमधील रक्तपेढीचे डॉ. किशोर धरमारे व सुखदेव उबाळे यांच्या मार्गदर्शनात रक्त संकलन करण्यात आले. अतिथींनी आनंदधाम परिसरात वृक्षारोपणही केले.

Web Title: 51 youths donated blood