५०० रुग्णांचा डॉक्टरसाठी संघर्ष

By Admin | Updated: May 19, 2014 00:53 IST2014-05-19T00:53:01+5:302014-05-19T00:53:01+5:30

परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शी मानसिक संघर्ष सुरू आहे. या संघर्षात मनोविकार तज्ज्ञांची साथ मोलाची. मात्र उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयातील ५०० रुग्णांचा डॉक्टरसाठीच संघर्ष सुरू आहे.

500 patients struggle for doctors | ५०० रुग्णांचा डॉक्टरसाठी संघर्ष

५०० रुग्णांचा डॉक्टरसाठी संघर्ष

नागपूर : परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शी मानसिक संघर्ष सुरू आहे. या संघर्षात मनोविकार तज्ज्ञांची साथ मोलाची. मात्र उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयातील ५०० रुग्णांचा डॉक्टरसाठीच संघर्ष सुरू आहे. येथील मनोविकार तज्ज्ञ रुग्णाला १० दिवसांनंतर तपासतो. नियमित तपासणी आणि मायेचा आधार मिळाल्यास हा आजार बरा होण्यास बळ मिळते. येथे मात्र रुग्णांची रुग्णालयातील परिस्थितीशी झुंज सुरू आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांना सेवा देण्यासाठी वर्ग ‘अ’मधील नऊ मनोविकार तज्ज्ञांची पदे मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात वर्ग ‘अ’मधील एक आणि उर्वरित चार मनोविकार तज्ज्ञ हे वर्ग ‘ब’मधील आहेत. मनोरुग्णालयात सद्यस्थितीत ३०० पुरुष आणि २०० महिला असे एकूण ५०० रुग्ण भरती आहेत. यातच सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभागात २०० वर रुग्ण येतात. यातील अनेक रुग्ण गंभीर स्वरूपाचे असतात. यातच सात ते आठ रुग्णांना तर विद्युत कंपन उपचार (ईसीटी) द्यावा लागतो. यासाठी मनोविकार तज्ज्ञाची गरज असते. या सर्वांची जबाबदारी या पाच मनोविकार तज्ज्ञांवर आहे. सद्यस्थितीत मनोरुग्णालयात एका मनोविकार तज्ज्ञाकडे १०० रुग्णांचा भार आहे. विशेष म्हणजे रुग्णालयाच्या नवीन आकृतिबंध योजनेत २००७ मध्ये ‘वर्ग अ’ मध्ये मनोविकार तज्ज्ञाच्या नऊ जागा देण्यात आल्या आहेत. मात्र एकच जागा भरण्यात आली आहे. उर्वरित चार जागा ‘वर्ग ब’मधून भरण्यात आल्या आहेत. यातही हे कंत्राट पद्धतीवर आहेत. यामुळे रुग्णसेवेवर याचा परिणाम पडत असल्याचा आरोप रुग्णांच्या काही नातेवाईकांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 500 patients struggle for doctors