शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

४० बसेस आल्या, १५० ची प्रतीक्षा

By admin | Updated: February 16, 2017 02:27 IST

महापालिकेच्या ‘आपली बस’ या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात नवीन वर्षाच्या शुभारंभाला १ जानेवारी २०१७ पासून

परिवहन विभागाची तयारी : १५ मार्गांवरून धावणार बसेस नागपूर : महापालिकेच्या ‘आपली बस’ या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात नवीन वर्षाच्या शुभारंभाला १ जानेवारी २०१७ पासून नागपूर शहरात नवीन ४५ बसेस धावणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु जेमतेम ४० बसेस आल्या आहेत. लवकरच इतर १५० बसेस मिळतील अशी अपेक्षा परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ५ डिसेंबरला ‘आपली बस’ प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते. यात ग्रीन बस व लाल बसेसचा समावेश होता. त्यानंतर बसेसला हिरवी झेंडी देण्यात आली होती. सुरुवातीला प्रवाशांची संख्या अधिक असलेल्या प्रमुख १५ मार्गावरून या बसेस धावणार आहेत. याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने जुन्या व नवीन अशा ४३२ लाल रंगाच्या व ५५ ग्रीन बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील ४० बसेस आल्या आहेत. पुढील काही महिन्यात शहरात ४८७ बसेस धावतील असा विश्वास परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी) निवडणुकीनंतर समितीचे बजेट महापालिका सभागृहाने नवीन परिवहन धोरणाला मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार शहर बस वाहतुकीचे पुनर्नियोजन केले जाणार आहे. बससेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी या विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पहिला अर्थसंकल्प नवीन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहणानंतर मांडला जाणार आहे.