शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

३६० अंश स्कॅनिंगने उलगडणार गुन्ह्यांचे रहस्य, गुन्हे तपासातील डिजिटल क्रांती; नागपूर पोलीस दलाला मिळणार अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 01:15 IST

नागपूर पोलीस दलाला मिळणार अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन, अंमली पदार्थांचीदेखील लगेच ओळख पटणार

नागपूर : अंमली पदार्थांसह गंभीर गुन्ह्यांच्या तपासात अचूकता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी नागपूरपोलिसांना लवकरच अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, या व्हॅनमधील थ्री डी डिजिटल मॉडेलिंग तंत्रज्ञान हे तपास प्रक्रियेला पूर्णपणे नवे वळण देणार आहे. यामुळे प्रत्यक्ष घटनास्थळाचे ३६० अंशात स्कॅनिंग करणे शक्य होणार आहे. या व्हॅनमुळे पुरावे एकत्रित करण्यासाठी मदत मिळणार आहे.भारतीय न्याय संहितेत गुन्ह्यांमधील ई-पुराव्यांना अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात सातत्याने प्रगत न्यायसहायक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिल्या आहेत. प्रयोगशाळांच्या आधुनिकीकरणासह आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनही राज्य पोलिस दलाच्या दिमतीला देण्यात येण्यात आल्या आहेत. सध्या राज्यभरात तब्बल २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तैनात करण्यात आल्या असून त्यात ८ आधुनिक व्हॅनचा समावेश आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाने अतिरिक्त फिचर्स असलेल्या दोन अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन मुंबई आणि नागपूरसाठी उपलब्ध केल्या आहेत. यातील एक व्हॅन नागपुरात दाखल झाली असून त्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. ते पूर्ण होताच ती नागपूर शहर पोलिसांना देण्यात येणार आहे.

एफटीआर आणि थ्री डी तंत्रज्ञानाचा समावेशया व्हॅनमध्ये दोन अतिरिक्त फिचर्स पुरविण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने अंमली पदार्थांची प्राथमिक स्वरुपात ओळख पटविणाऱ्या एफटीआर उपकरणांचा समावेश आणि संपूर्ण घटनास्थळाचे त्रिमितीय डिजिटल मॉडेल उपलब्ध करणाऱ्या कॅमेरा फिचर्सचा समावेश आहे. या व्हॅनमध्ये उपलब्ध अत्याधुनिक कॅमेरांच्या सहाय्याने कुठल्याही महत्त्वाच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष घटनास्थळाचे ३६० अंशात स्कॅनिंग करणे शक्य होणार आहे. या थ्री डी डिजिटल चित्रणात घटनास्थळाचे नेमके लोकेशन, दृश्य, अचूक मोजमाप, घटनास्थळावरील वस्तू अशा सर्व प्रकारच्या डिजिटल नोंदी घेणे शक्य होईल. त्यामुळे पोलिसांच्या एकूणच तांत्रिक तपासात संपूर्ण पारदर्शकता येईल व नोंदी डिजिटल स्वरुपात साठविल्या जातील. अगदी घटनास्थळापासून ते प्रयोगशाळेपर्यंतच्या साऱ्या घडामोडी टिपता येणे शक्य होणार आहे. घटनास्थळावरील प्रत्येक गोष्ट ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे सुरक्षितपणे साठवली जाते. त्यामुळे पुराव्यांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता पूर्णपणे टाळता येईल अशी माहिती नागपूरच्या प्रादेशिक न्यायसहायक प्रयोगशाळेच उपसंचालक अश्विन गेडाम यांनी दिली.

जागेवरच अंमली पदार्थांची ओळख पटणारएखाद्या व्यक्तीकडे आढळून आलेला संशयित पदार्थ अंमली पदार्थ आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी त्याला जप्त करून न्यायसहायक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जाते व त्याचा अहवाल आल्यानंतर पोलिसांची कारवाई सुरु होते. मा६ आता या व्हॅनमुळे घटनास्थळावरच ओळख पटविणे करणे शक्य होणार आहे

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Police to Get Advanced Forensic Van for Crime Solving

Web Summary : Nagpur police will soon receive a state-of-the-art forensic van equipped with 360-degree scanning and 3D modeling. This technology will revolutionize crime investigations by enabling precise digital documentation of crime scenes. The van also features on-site drug identification, enhancing investigation efficiency and evidence security.
टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर