शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या अवयवातील तस्करीत पुन्हा ३ आरोपींची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

नागपूर : बुटीबोरी वनपरिक्षेत्रात ९ सप्टेबरला केलेल्या वाघांच्या अवयवाच्या तस्करींच्या आरोपींमध्ये पुन्हा तिघांची भर पडली आहे. त्यामुळे या प्रकरणातील ...

नागपूर : बुटीबोरी वनपरिक्षेत्रात ९ सप्टेबरला केलेल्या वाघांच्या अवयवाच्या तस्करींच्या आरोपींमध्ये पुन्हा तिघांची भर पडली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता ६ वर पोहचली आहे.

९ सप्टेबरला बोरखेडी टोल नाका येथे सापळा रचून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाच्या १३ मिशा आणि ६ नखांसह पोंभूर्ण तालुक्यातील (केमारा, जि. चंद्रपूर) येथील योगेश लालश्याम तोडासे, रामचंद्र तुकाराम बावणे आणि श्रीराम लक्ष्मण पोरेते यांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी केल्यावर या तस्करीमध्ये नव्याने नावे समोर आली. त्यामुळे वन विभागाच्या पथकाने केमारा येथे जाऊन पुन्हा तिघांना ताब्यात घेतले. श्रीदास बळीराम कडते, प्रभाकार बाबाजी तोडासे, मुरलीधर केशव नैताम अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या घराची झडती घेऊन वाघाला पुरलेल्या ठिकाणची तपासणी केली. यावेळी त्यांच्याकडे वाघाची हाडे ५.६०० किलोग्रॅम, नखे १६ , वाघाच्या मिशा ४२, खवल्या मांजरीचे खवले, वाघाच्या हाडाचे तुकडे १३५ ग्रॅम, दोन भाले व तार बंडल असे साहित्य सापडले. ते जप्त करून शनिवारी त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. या सर्वांना १४ सप्टेबरपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे.