शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

२९ दलालांचे परवाने रद्द

By admin | Updated: April 30, 2016 03:07 IST

शहरातील ठोक भाजीबाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत नसून, तो शहरातील मध्यवस्तीत भरतो.

शेतकऱ्यांकडून सेस वसुली सुरूच : भाजीबाजार स्थानांतरणाला दलालांचा विरोधबाबा टेकाडे सावनेर शहरातील ठोक भाजीबाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत नसून, तो शहरातील मध्यवस्तीत भरतो. या बाजारात कार्यरत असलेल्या २९ दलालांनी बाजार समितीच्या नियमांचे पालन न करता त्यांचे परवान्यांचे नियोजित काळात नूतनीकरण केले नाही. परिणामी, या सर्वांचे परवाने बाजार समिती प्रशासनाने रद्द केले आहे. तरीही सदर दलाल शेतकऱ्यांकडून वाजवीपेक्षा अधिक सेस वसूल करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या भाजीबाजारात एकूण २९ दलाल कार्यरत आहेत. त्या सर्वांना पणन संचालनालयाच्या नियम व अटींना आधीन राहून बाजार समिती प्रशासनाने दलालीचे परवाने अदा केले होते. या सर्वांच्या परवान्यांची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली. सदर दलाल बाजार समितीच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करीत असल्याने बाजार समिती प्रशासनाने कुणाच्याही परवान्याचे नूतनीकरण केले नाही. परिणामी, या दलालांना बाजारात दलाली करण्याचा कोणताही अधिकार राहिला नाही. तरीही हे दलाल मनमानी करीत शेतकऱ्यांकडून वाजवीपेक्षा अधिक सेस वसूल करीत आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. वास्तवात, या दलालांवर कुणाचाही अंकुश नसल्याने ते बाजार समितीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. या संदर्भात बाजार समिती प्रशासनाने या दलालांना वारंवार स्मरणपत्र देऊन बजावले तरीही, उपयोग झाला नाही. परिणामी, दलाल बाजार समितीच्या मार्केट यार्डात खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायला तयार नाही. दुसरीकडे, हा भाजीबाजार शहराच्या मध्यभागी असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत असल्याने या दलालांनी त्यांचा हा व्यवहार मार्कट यार्डात करण्याच्या भूमिकेवर बाजार समिती ठाम आहे. सावनेर शहरातील ठोक भाजीबाजार स्थानांतरणाला दलालांचा विरोध आहे. बाजार समिती व दलाल यांच्या लढाईत शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून, स्थानिक नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. दलालांनी बाजार समितीच्या नियमानुसार त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करवून घेतल्यास तसेच नियमानुसार व्यवसाय केल्यास सर्वांच्या सोयीचे ठरणार आहे. दलाल मनमानी करीत असल्याने त्यांनी भाजीबाजारात केलेले अतिक्रमण नगर परिषद प्रशासनाने हटवावे. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केल्याशिवाय या भाजीबाजाराचे स्थानांतरण होणार नाही, अशा प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केल्या.