शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
2
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
3
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
4
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
5
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
6
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
7
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
8
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
9
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
10
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
11
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
12
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
19
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
20
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

२७० किलो भेसळयुक्त तूप जप्त

By admin | Updated: July 10, 2014 00:45 IST

कमी खर्चात अधिक पैसे कमविण्याच्या उद्देशाने भेसळयुक्त तूप विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या तीन व्यक्तिंना फे्रजरपुरा पोलिसांनी बुधवारी अटक केली. इंदला परिसरातील या आरोपींकडून

तीन आरोपींना अटक : फे्रजरपुरा पोलिसांची कारवाईअमरावती : कमी खर्चात अधिक पैसे कमविण्याच्या उद्देशाने भेसळयुक्त तूप विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या तीन व्यक्तिंना फे्रजरपुरा पोलिसांनी बुधवारी अटक केली. इंदला परिसरातील या आरोपींकडून पोलिसांनी २७० किलो भेसळयुक्त तूप जप्त केले. ऐन सणासुदीच्या तोंडावर हे बनावट तूप ग्राहकांच्या माथी मारण्याचा आरोपींचा प्रयत्न यामुळे फसला.गोंडप्पा नागोप्पा यमगवळी (६०), बबन गंगाराम घुले व महादेव मराजी काळे (६८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी बनावट तूप विक्रीचा गोरखधंदा उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात अन्न व औषधी प्रशासन सतर्क होते. विभागाकडून विविध ठिकाणी कारवाईचा सपाटा सुरु होता. याच दरम्यान फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन देशमुख यांना इंदला परिसरात सुरू असलेल्या या भेसळयुक्त तुपाच्या गोेरखधंद्याबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप राजपूत, एएसआय प्रकाश राठोड, रमेश निंभोरकर, विनय गुप्ता, ओमप्रकाश देशमुख, विलास बाभुळकर, सचिन शेळके, संजय देऊळकर, अमर बघेल, विजय बरडे यांच्या पथकाने इंदला परिसरातील तीन घरांवर छापामार कारवाई करून १५ किलोचे १४ डब्बे आणि १ किलोचे ६० पॅकेट असे २७० किलो भेसळयुक्त तूप फ्रेजरपुरा पोलिसांनी जप्त केले.