२७ टक्के स्त्रियांना मधुमेहाचा धोका

By Admin | Updated: April 7, 2016 03:01 IST2016-04-07T03:01:36+5:302016-04-07T03:01:36+5:30

अयोग्य जीवनशैली, व्यायामाचा अभाव व तणावामुळे नागपुरात २७ टक्के स्त्रियांना मधुमेहाचा धोका आहे.

27% of women have diabetes risk | २७ टक्के स्त्रियांना मधुमेहाचा धोका

२७ टक्के स्त्रियांना मधुमेहाचा धोका

उपराजधानीतील सर्वेक्षणाचा निष्कर्ष : २५ ते ३५ वयोगटातील लोकांमध्ये ‘टाईप २’
नागपूर : अयोग्य जीवनशैली, व्यायामाचा अभाव व तणावामुळे नागपुरात २७ टक्के स्त्रियांना मधुमेहाचा धोका आहे. स्थूलपणाच्या ७० टक्के प्रकरणांपैकी २० ते २२ टक्के लोकांना मधुमेह होण्याची शक्यता असते. परिणामी, हृदयविकार व हृदयाघातामध्ये ७-८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून सामोर आले आहे. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्यदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यावर्षी ‘सवय आरोग्यदायी जीवनशैलीची, वाट रोखेल मधुमेहाची’, हे ब्रीदवाक्य दिले आहे. याला घेऊन ‘इंडस हेल्थ प्लस’ने फेब्रुवारी २०१५ ते २०१६ या कालावधीमध्ये १७,६४७ लोकांच्या प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करून घेतल्या. यात हे वास्तव समोर आले आहे. इंडस हेल्थ प्लसचे प्रीव्हेन्टिव्ह हेल्थकेअर स्पेशालिस्ट अमोल नायकवाडी यांनी सांगितले की, या सर्वेक्षणातून नागपूरमधील पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. मधुमेहाचा त्रास फक्त प्रौढ व्यक्तींनाच नव्हे तर तरुण व्यक्तींनाही होताना दिसतो आहे. नियमित आणि वेळच्यावेळी तपासणी करून घेतल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. मधुमेहाची लक्षणे, लवकरात लवकर करून घेतलेले निदान याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता शासनाने विशेष धोरण राबविणे आवश्यक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: 27% of women have diabetes risk