शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२४८ प्रवाशांनी केला ‘ब्लड रिलेशन’मध्ये प्रवास

By admin | Updated: July 29, 2015 03:04 IST

अचानक प्रवासाचा बेत रद्द झाला. वडिलांच्या ठिकाणी मुलाला, मुलीला किंवा मुलाच्या ठिकाणी वडिलांना जाण्याची वेळ आली की धावपळ होते.

दयानंद पाईकराव  नागपूर अचानक प्रवासाचा बेत रद्द झाला. वडिलांच्या ठिकाणी मुलाला, मुलीला किंवा मुलाच्या ठिकाणी वडिलांना जाण्याची वेळ आली की धावपळ होते. ऐनवेळी तिकीट कन्फर्म होत नसल्यामुळे प्रवास कसा करायचा असा प्रश्न निर्माण होते. परंतु रेल्वेतर्फे देण्यात येत असलेली ‘ब्लड रिलेशन’ची सुविधा वरदान ठरत आहे. १ एप्रिल ते २८ जुलै या कालावधीत २४८ प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतल्याची नोंद आहे.रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षणाचे तिकीट खरेदी केल्यानंतर अनेकदा अचानक प्रवास रद्द करण्याची पाळी येते. वडील प्रवास करीत असतील तर अनेकदा त्यांच्या ठिकाणी मुलाला जाण्याची पाळी येते. अशा परिस्थितीत रेल्वेतर्फे देण्यात येत असलेल्या ‘ब्लड रिलेशन’च्या सुविधेमुळे कुटुंबातील सदस्य प्रवास करू शकतात. त्यासाठी प्रवासाच्या २४ तास आधी रेल्वेच्या आरक्षण कार्यालयात जाऊन रीतसर अर्ज करावा लागतो. जी व्यक्ती प्रवास करणार होती तिचे ओळखपत्र, जी व्यक्ती ऐनवेळी प्रवास करणार आहे तिचे ओळखपत्र सादर करावे लागते. याशिवाय दोघांमधील नातेसंबंध दाखविणारा पुरावा सादर करावा लागतो. त्यानंतर संबंधित नातेवाईकास प्रवास करण्याची परवानगी मिळते. या सुविधेमुळे अनेक प्रवाशांना लाभ मिळत आहे. केवळ रक्ताच्या नातेवाईकांनाच नव्हे तर कार्यालयातील अधिकारी जाणार असेल आणि ऐनवेळी त्याचा प्रवास रद्द करावयाचा असल्यास कार्यालयाच्या पत्रावर अर्ज केल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या ठिकाणी दुसरा कर्मचारी जाऊ शकतो. परंतु कार्यालयाच्या कर्मचाऱ्याला प्रवास करण्यासाठी प्रवासाच्या ४८ तास आधी अर्ज सादर करण्याचे बंधन आहे. १ एप्रिल ते २८ जुलै २०१५ या कालावधीत नागपूर विभागातून २४८ प्रवाशांनी ‘ब्लड रिलेशन’चे पुरावे जोडून प्रवास केल्याची नोंद आहे.अशी आहे प्रक्रिया‘ब्लड रिलेशन’मध्ये प्रवास करण्यासाठी आधी प्रवास करणारा आणि नंतर प्रवास करणारा प्रवासी या दोघांचेही ओळखपत्र द्यावे लागते. नातेवाईकांसाठी २४ तास आधी अर्ज सादर करावा लागतो. रक्ताचे नाते असल्याचा पुरावाही सादर करावा लागतो. यात रेशनकार्डवर सर्वच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्यामुळे हा पुरावा महत्त्वाचा ठरतो तर कार्यालयातील कर्मचाऱ्याला प्रवास करावयाचा असल्यास ४८ तास आधी कार्यालयाच्या पत्रावर अर्ज करावा लागतो.