शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२१ अवैध प्रवासी वाहने जप्त

By admin | Updated: July 4, 2014 01:08 IST

शहरात अवैध प्रवासी घेऊन धावत असलेली २१ वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने जप्त केली. यात १२ टाटा मॅजिक, चार जीप तर पाच बसेस आहेत. चार दिवसांच्या उसंतीनंतर पुन्हा सुरू

आरटीओची कारवाई : लोकमतच्या वृत्ताची दखलनागपूर : शहरात अवैध प्रवासी घेऊन धावत असलेली २१ वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने जप्त केली. यात १२ टाटा मॅजिक, चार जीप तर पाच बसेस आहेत. चार दिवसांच्या उसंतीनंतर पुन्हा सुरू झालेल्या कारवाईने अवैध प्रवासी वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे.‘लोकमत’ने २५ जून बुधवारच्या अंकात ‘मृत्यूचा महामार्ग कामठी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेऊन आरटीओ शहर कार्यालयाने ही कारवाई केली. नागपूर- कामठी या मार्गावर पोलिसांसमक्ष मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. टाटा मॅजिक, अ‍ॅपे, सहासीटर अशा साधारण ३०० वाहनातून ही अवैध वाहतूक बिनधास्त सुरू आहे. विना परमीट त्यातही सहा सिट्सची परवानगी असताना १५-२० प्रवासी बसवून भन्नाट वेगाने ही वाहने धावत आहेत. नियमानुसार या वाहनांना टप्पा वाहतूक करता येत नाही. असे असतानाही व्हेरायटी चौक ते कामठी मार्गावरील सर्व चौकांतून प्रवासी घेताना दिसतात. एलआयसी चौकात तर यांचा स्टॅण्ड आहे. पोलिसांच्यासमोर ही वाहतूक सुरू असतानाही कारवाई नावापुरतीच असल्याचे चित्र आहे. हे वृत्त प्रकाशित होताच आरटीओ शहर कार्यालयाने याची दखल घेतली. २६ जून रोजी कामठी व इतर मार्गावरील १४ अवैध प्रवासी वाहने जप्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाहनांवर ही पहिल्यांदाच कारवाई झाल्याचे बोलले जात असताना आज गुरुवारी झालेल्या कारवाईत २१ वर वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. (प्रतिनिधी)