शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२०० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे भविष्य अधांतरी!

By admin | Updated: March 11, 2015 02:06 IST

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रशासकीय कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे वैद्यकीय अधिकारी मागील अनेक वर्षांपासून अस्थायी म्हणूनच काम करीत आहे.

नागपूर : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रशासकीय कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे वैद्यकीय अधिकारी मागील अनेक वर्षांपासून अस्थायी म्हणूनच काम करीत आहे. प्रशासनातर्फे दर चार महिन्यांमध्ये नियुक्ती पत्राचे नूतनीकरण केले जाते. यामुळे या अधिकाऱ्यांचे भविष्य अधांतरी असल्याचे कारण सांगितले जात आहे. पूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय मेडिकल कॉलेमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत होते. परंतु, आरोग्य विभागाने आपल्या सर्व अधिकाऱ्यांना परत बोलावले. यामुळे मेडिकल कॉलेज अडचणीत आले होते. यामुळे तात्पुरती सोय म्हणून कंत्राटपद्धतीवर वैद्यकीय अधिकारी घेण्यात आले. सध्याच्या स्थितीत राज्यभरातील १४ वैद्यकीय कॉलेजमध्ये जवळपास २०० वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यात काही पाच ते तीन वर्षांपासून सेवा देत आहेत. या पदासाठी कमीतकमी ‘एमबीबीएस’ योग्यता असते. नियुक्तीदरम्यान यांना नियमित आॅर्डर दिले जात नाही. उलट चार महिन्यानंतर नियुक्तीचे आॅर्डरचे नूतनीकरण केले जाते. सर्व प्रशासकीय कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे मेडिकल अधिकाऱ्यांची ‘ड्युटी’ २४ तासांची असते. परंतु, शासनाने या अधिकाऱ्यांना स्थायी करण्याचा कोणताही विचार केला नाही.(प्रतिनिधी) मेडिकल, मेयोमध्ये ५० ‘एमओ’मेडिकल आणि मेयो कॉलेजमध्ये जवळपास ५० वैद्यकीय अधिकारी (एमओ) नियमित न झाल्याने त्यांच्यावर नेहमीच टांगती तलवार असते. कर्तव्यात जराही चूक झाल्यास किंवा अधिष्ठात्यांचे समर्थन न मिळाल्यास नियुक्ती पत्राचे नुतनीकरण होणार की नाही याची शाश्वती नसते. मेडिकल अधीक्षक प्रभारीच!मेडिकल अधिकाऱ्यांसोबतच वैद्यकीय अधीक्षकसुद्धा प्रभारी आहेत. कोणत्याही विभागप्रमुखाकडे ही जबाबदारी सोपविली जाते. रुग्णालय व प्रशासकीयसह रुग्णांची काळजी व तक्रारींचा निपटारा अधीक्षकांना करावा लागतो. सकाळी विभागाची ‘ओपीडी’ सांभाळणे व दुपारी प्रशासकीय कामकाज पाहणे अशी दुहेरी भूमिका त्यांना पार पाडावी लागते. शासन एका अधिकाऱ्याकडून प्रशासकीय व वैद्यकीय अशी दोन काम करवून घेते. वेतन मात्र एकाच पदाचे देते, हे विशेष.