७५ दिवस तिची व्हेंटिलेटरवर काळाशी झुंज, मेडिकलच्या डॉक्टरांच्या प्रयत्नाना यश 

By सुमेध वाघमार | Published: April 28, 2023 03:08 PM2023-04-28T15:08:06+5:302023-04-28T15:11:29+5:30

१९ वर्षीय दिव्याचा शरीरातील मासपेशी कमजोर पडल्या. ‘पॅरालिसीस’मुळे दोन्ही हातपाय लुळे पडले. याचा प्रभाव श्वास यंत्रणेवरही झाला.

19 year old girl fought against health issues on ventilator for 75 days, the efforts of medical doctors were successful | ७५ दिवस तिची व्हेंटिलेटरवर काळाशी झुंज, मेडिकलच्या डॉक्टरांच्या प्रयत्नाना यश 

७५ दिवस तिची व्हेंटिलेटरवर काळाशी झुंज, मेडिकलच्या डॉक्टरांच्या प्रयत्नाना यश 

googlenewsNext

नागपूर : ‘गुलियन बँरी सिंड्रोम' (जीबीएस) या दुर्मिळ आजाराने १९ वर्षीय दिव्याचा शरीरातील मासपेशी कमजोर पडल्या. ‘पॅरालिसीस’मुळे दोन्ही हातपाय लुळे पडले. याचा प्रभाव श्वास यंत्रणेवरही झाला. गंभीर स्थिती निर्माण झाल्याने व्हेंटिलेटरवर ठेवले. या दरम्यान फुफ्फुसांमध्ये ‘म्युकस ब्लॉक’, निमोनिया, कमी जास्त रक्तदाब, डायरियाही झाला. दिव्याला वाचविण्यासाठी मेडिकलचा डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न केले. दिव्यानेही काळाशी झुंज दिली. या यशस्वी संघर्षाचा प्रवासात ७५ दिवसांनी ती व्हेंटिलेटरमधून बाहेर आली, जगण्याची नवी उमेद मिळाली. 

दिव्या अकोला येथील रहिवासी. डिसेंबर महिन्यात अचानक तिचे हातापायाला पॅरालिसीस झाले. मानही उचलता येत नव्हती. अकोला येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. ‘जीबीएस’ नावाचा दुर्मिळ आजाराचे निदान झाले. तिच्यावर १५ दिवसांचा उपचाराचा खर्च १६ लाखांवर गेला. हालाकिच्या स्थितीत असलेल्या आई-वडिलांवर शेती, दागिने विकण्याची वेळ आली. परंतु पैसे संपल्याने १५ जानेवारीला दिव्याला नागपूर मेडिकलमध्ये आणले. दिव्याची गंभीर स्थिती पाहून डॉक्टरांनी तातडीने वॉर्ड क्रमांक ५२मधील आयसीयूमध्ये भरती केले. व्हेंटिलेटरवर घेतले. वरीष्ठ डॉक्टरांच्या नेतृत्वात निवासी डॉक्टर, त्यांच्यासोबतील परिचारिकांनी उपचाराला सुरूवात केली.

Web Title: 19 year old girl fought against health issues on ventilator for 75 days, the efforts of medical doctors were successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.