शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
3
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
4
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
5
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
6
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
7
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
8
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
9
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
10
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
11
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
12
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
13
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
14
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
15
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
16
Nashik: घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
17
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
18
Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
19
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
20
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
Daily Top 2Weekly Top 5

१६० कोटीची थकबाकी

By admin | Updated: May 18, 2014 01:01 IST

ग्रामीण व शहरी भागात पाणीपुरवठा योजनांचे नियोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थाकडे पाणीपट्टीचे १६० कोटी थकबाकी आहे.

जीवन प्राधिकरण : पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती रखडली

नागपूर: ग्रामीण व शहरी भागात पाणीपुरवठा योजनांचे नियोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थाकडे पाणीपट्टीचे १६० कोटी थकबाकी आहे. थकबाकीची वसुली होत नसल्याने योजनांची दुरुस्ती रखडली असून प्राधिकरणच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद व महापालिकांच्या जलव्यवस्थापन केंद्राची कामे, त्यांचे परिरक्षण यासह ठेवीच्या स्वरूपातील बांधकाम अशा स्वरूपाची कामे प्राधिकरणमार्फत केली जातात. यापासून मिळणार्‍या पाणीपट्टीतून प्राधिकरणचा आस्थापना खर्च, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती व अन्य कामे केली जातात. मागील काही वर्षापासून हा निधी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थाकडून वसूल होत नाही. पूर्वी अशा स्वरूपाची थकबाकी वसूल न झाल्यास मध्यवर्ती अनुदानातून कपात क रून ही रक्कम जीवन प्राधिकरणच्या खात्यात वळती केली जात होती. २००३ सालापासून निधी वळता करण्याची प्रक्रि या शासनाने थांबविली. त्यामुळे वसुली थांबली आहे. याचा परिणाम कामकाजावर होत आहे. नागपूर विभागातील बल्लारपूर पाणीपुरवठा योजना, देवलामेटी व नागपूर जिल्हा परिषदेची वेणा पाणीपुरवठा आदी योजनांकडे २७ कोटींची थकबाकी आहे. अमरावती विभागातील अमरावती महापालिकेसह अंजनगाव, दर्यापूर, मोर्शी नगर परिषद तसेच खोलापूर ग्रामपंचायत यांच्याकडे ७८ कोटींची थकबाकी आहे. यवतमाळ विभागातील यवतमाळ, खामगाव, जळगाव, पातूर, आकोट, कारंजा व मानोरा पाणीपुरवठा योजनांकडे ५४ कोटी ५३ लाखांची थकबाकी आहे. (प्रतिनिधी) अनुदानातून थकबाकीची कपात व्हावी स्थानिक स्वराज्य संस्थाकडील १६० कोटींच्या थकबाकीची वसुली होत नसल्याने प्राधिकरणला योजनांची देखभाल व दुरुस्ती करण्यात अडचणी येत आहेत. शासनाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्यवर्ती अनुदानातून थकबाकीची कपात केल्यास प्राधिकरण र्आिर्थक संकटातून सावरेल, अशी प्रतिक्रि या जीवन प्राधिकरणचे सहायक अभियंता ए. के. ढवळे यांनी दिली